नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! काही लोकांना नाही पटणार हा विषय, पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलाय आणी त्याचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच पटेल. अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, जसे की, शारिरीक, मानसिक, आर्थिक, अपमानास्पद वागणुक, कोणांचे मन दुखावले असू शकते, कोणावर अन्याय केला गेलेला असतो, कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते.

छळ केलेला असेल,कोणाची हक्काची फसवून प्रॉपर्टी हडपली असेल, कोणाला अनिती करायला बळ दिल असेल, शारिरीक दुखापत केलेली असेल, विश्वासात गैरफायदा घेतला गेलेला असेल, ज्याने उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल, त्रासाचे कुठलेही कारण असो.

वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो, तो खुप दुःखी होतो, त्याचे मनोबल कमकुवत होत असते, पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते, जाणुन-बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल.

पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्ती कडुन च’मत्कार होत नाही, किंवा देवदेखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही, पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडुन अतिशय तेजस्वी नकारात्मक उर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते, मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्यालाच तळतळाट अस म्हटले जाते.

मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो, त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही, सतत अपयश येणे, घरात आजारपण येणे, अश्या अनेक प्रकारची काहीही घटना घडू शकतात, आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत हे फक्त आपल्याला व

आपल्या अंतर्मनालाच माहीत असते. समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे. त्याची परतफेड शक्यतो याच जन्मात करावी लागते, तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक, चांगल्या-वाईट गोष्टींचा हिशोब सव्याज परत करावाच लागतो,

मी एका पुस्तकात वाचले होते, राजा धृतराष्ट्राचे शंभर च्या-शंभर पुत्र युध्दात मारले गेले, तेव्हा त्याने श्रीकृष्णा ला विचारले की अस का व्हावे? माझ्या संबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेलं नाही, की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या-सर्वच पुत्रांचा मृत्यु आपल्या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे?

तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पुर्व-जन्म पहाण्याची दिव्य-दृष्टि दिली. धृतराष्ट्र राजाने दिव्य-दृष्टिद्वारे पाहीले की साधारण पन्नास जन्मापुर्वी तो एक पारधी होता, आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले.

मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्षांची शंभरएक लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली. धृतराष्ट्र राजाची त्यावेळची ती क्रिया होती, त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युध्दात मारले गेले तेव्हाच ते पुर्ण झाले.

कर्म हे फळ देऊनच शांत होते. प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच, हा प्रत्येकाच्या कर्माचा सिध्दांतच आहे, चांगले कर्म, चांगले फळ देऊनच शांत होते. वाईट कर्म, वाईट फळ देऊनच शांत होते. फक्त वेळ आणि काळ मागे-पुढे होऊ शकते. हाच कर्माचा सिध्दांत आहे.

आता आपणच ठरवायचे आहे,आपले कर्म कसे हवे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥ क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट. आणि हो महत्वाचे म्हणजे शे’अर जरूर करा, चांगले विचार दुसऱ्यांपर्यत पोहोचवणे हा सुद्धा पुण्याचाच भाग आहे, कदाचित एक कर्म तुमच्या खात्यात जमा होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *