नमस्कार मित्रांनो.. “Marathi Duniya” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो आपल्यातील प्रत्येक व्यक्ती पैसा मिळवण्यासाठी दिवस रात्र धडपडतो य कष्ट करतो आहे. यामध्ये अनेक जणांना प्रारब्धामुळे नशिबामुळे पैसा मिळून जातो. ते जादा श्रीमंत बनतात. मात्र काही कमनशिबी लोक असे असतात की दिवस रात्र मेहनत करून सुद्धा काबाड कष्ट करून सुद्धा त्यांच्याकडे पैसा येत नाही.

आणि अशाच लोकांसाठी एक अत्यंत प्रभावशाली एंजल नंबर ज्याला हिलिंग नंबर असेही म्हणतात. गरीब असो श्रीमंत असो तुम्हाला जितक्या पैश्यांची अपेक्षा आहे, इच्छा आहे, मनोकामना आहे.तितके पैसे स्मरण करत, तितके पैसे प्राप्त व्हावेत अशी इच्छा व्यक्त करत हा एंजल नंबर आपण आपल्या शरीराच्या डाव्या भागावर लिहायचा आहे.

तितकी मेहनत करण्याची, कष्ट करण्याची बुद्धी पणाला लावण्याची तुमची स्वतःची तयारी असायला हवी. जसं की लॉटरीचे टिकट 10 रुपयांचे काढले आहे. त्यावर 1 लाखांचे बक्षीस असेल तर त्यातून 1 लाखच मिळतील. 1 करोड मिळणार नाहीत.

अगदी त्याच प्रकारे तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात, कार्य करत आहात. त्यातून जितका पैसा मिळायला हवा तितकाच तो मिळणार आहे.आणि त्यापेक्षा जास्त मिळणे अशक्य आहे. कदाचित काहीजण ज्याला आपण गुप्त धन असे म्हणतो जे अचानक आपल्याजवळ येऊ लागते. कोणतीही अपेक्षा नसताना अशा प्रकारे सुद्धा धन प्राप्ती होऊ शकते. हा आपल्या प्रत्येकाच्या प्रारब्धाचा भाग आहे.

आणि मित्रांनो हा जो नंबर आहे हा एंजल नंबर आहे. हा नंबर आपण आपल्या डाव्या भागावर लिहायचा आहे. लिहिण्यासाठी हिरव्या शाईचा वापर करायचा आहे.आणि मित्रांनो लाल शाई, काळी शाई चुकूनही वापरू नये. त्याचे उलटे परिणाम प्राप्त होतात. आहे तो पैसा सुद्धा निघून जातो. असा वाईट अनुभव काही जणांना आलेला आहे.

त्यामुळे आवर्जून सांगतो की हिरव्या शाईचा वापर करा. तुम्ही हिरवा स्केचपेन वापरू शकता. त्याचा वापर करू न आपण आपल्या डाव्या अंगाला नंबर आपण लिहायचा आहे. हा उपाय केवळ एक दिवस करून चालणार नाही आणि दररोज सकाळी उठल्यानंतर अंघोळ केल्यावर आपण या हिरव्या रंगाच्या शाईने हा नंबर लिहायचा आहे.

आणि मित्रांनो ज्या ठिकाणी पहिल्यांदा लिहा ल. त्याच ठिकाणी अगदी वारंवार गिरवायचा आहे. लिहिताना त्याचा उच्चार करा. तोंडाने बोला. हा जो नंबर आहे त्याचा जप करा. तो नंबर मी तुम्हाला सांगत आहे. 199621147 हा जादुई एंजल नंबर आहे. हा नंबर तुम्ही लिहिताना जेव्हा तुम्ही हा नंबर लिहिताय तेव्हा तुम्हाला जितकी रक्कम हवी आहे.

जितका पैसा हवा आहे आणि ज्या पैश्यांची अपेक्षा आहे. ती रक्कम आपण आपल्या मनामध्ये धरायची आहे. इतकी रक्कम, इतका पैसा, इतके धन मला मिळायलाच हवे. जर तुम्ही 1 लाख म्हणताय, 50 हजार तर नक्की येतील. 1 करोड म्हणताय 50, 60 लाख नक्की येतील.

आणि तुमचे पैसे कमविण्याचे जे मार्ग आहे त्यातून जितका पैसा मिळू शकतो, जसं त्या 10 रुपयाच्या तिकिटावर 1 लाखाचीच लॉटरी लागणार आहे आणि जर तुम्हाला 1 कोटींची पाहिजे तर तुम्हाला तिकीटाची रक्कम वाढवावी लागेल. म्हणजे 10 रुपयांचे नव्हे 100, 1000 रुपयांचे तिकीट काढावे लागेल.

म्हणजे तुम्हाला खूप जास्त पैसा हवा आहे तुमची अपेक्षा आहे तर कष्ट सुद्धा तितके जास्त करावे लागतील. बुध्दी सुद्धा तितकीच पणाला लावावी लागेल. कारण या जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही. आणि या उपायांबरोबरच मित्रांनो तुम्हाला एंजल नंबर चा जप सकाळ सायंकाळ तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या मंत्राचा जप तुम्ही करू शकता, एक तर सकाळी उठल्याबरोबर करायचा आहे.

आणि मित्रांनो रात्री झोपताना सुद्धा करायचा आहे. 199621147 सतत म्हणत रहा. इंग्रजीत म्हंटले तरी चालेल. हिंदी मध्ये म्हंटले तरी चालेल. तुमची जी मातृ भाषा आहे जी तुम्हाला सोपी जाते. त्या भाषेत जप केलात तरी चालेल. जास्तीत जास्त वेळा करा. कमीत कमी 60 दिवस नित्य नियमाने दररोज उठल्यावर या मंत्राचा जप करा आणि अंघोळ केल्यावर या नंबरचा जप करायचा आहे.

ज्या ठिकाणी लिहिला आहे तो पुसटसा होणार आहे. तो पुन्हा लिहा हिरव्या रंगाच्या शाईने. रिझल्ट्स तुमच्या समोर असतील. प्रत्येक वेळी गिरवताना लक्षात घ्या तुम्ही जी रक्कम मनात ठेवली आहे ती रक्कम आपण पुन्हा पुन्हा बोलायची आहे. अत्यंत प्रभावशाली असा हा नंबर आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *