मित्रानो, अनेक लोकांना घरातील भिंतींवर आपल्या मुलांचे फोटो लावायला आवडते. त्यांच्या बालपणीचे अविस्मरणीय क्षण फोटांमध्ये पाहून मन आनंदाने भरून येते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हे लहान मुलांचे फोटो लावतांना कोणतीही चूक करणे तुम्हाला खूप महाग पडू शकते.

खरे तर मुलांचे फोटो लावण्याबाबत काही विशेष नियम वास्तुशास्त्रात सांगितलेले आहेत. हे नियम लक्षात ठेऊन जर तुम्ही तुमचे घर लहान मुलांच्या फोटोंनी सजवले तर तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न होईल आणि कुटूंबातील प्रेम वाढेल. हे नियम काय आहेत ते जाणून घेऊया.

तुमच्या घराची पश्चिम दिशा मुलांशी आणि सर्जनशीलतेशी संबंधित आहे. या दिशेला मुलांचे फोटो लावणे खूप शुभ मानले जाते. त्याचा फोटो या दिशेला लावल्याने मुलं अभ्यासात हुशार होतात आणि आयुष्यात नेहमी पुढे जातात.

जर तुम्हाला एकच मुलगा असेल तर तुम्ही त्याचा फोटो दक्षिण दिशेला असलेल्या भिंतीवर लावू शकता. असे केल्याने तुमचा मुलगा लवकरच जबाबदार बनतो आणि संपूर्ण कुटुंबाची एकहाती काळजी घेण्याचे धैर्य त्याला प्राप्त होते. ही दिशा घराच्या मालकाशी संबंधित आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या एकुलत्या एक मुलाचा फोटा या दिशेला लावू शकता.

वास्तुनुसार तुमच्या मुलांचा फोटो पूर्व दिशेला लावल्याने तुमचे मूल तेजस्वी आणि उत्साही बनतात. जीवनात यशस्वी स्थान निर्माण करतो आणि देवाची कृपा त्याच्यावर सदैव राहते.

मुलांचे ते फोटो घराच्या उत्तर-पूर्व दिशेला लावावे. या फोटोमध्ये तुम्ही देखील असले पाहिजे. वास्तुनुसार या दिशेला फॅमिली फोटो लावणे सर्वात शुभ मानले जाते. फॅमिली फोटो भितांवर लावल्याने कौटुंबातील सदस्यांमधील संबंध दृढ होतात. एकमेंकाबद्दल आपुलकी वाढते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *