नमस्कार मित्रांनो, आपल्या जीवनावर आसपासच्या गोष्टींचा सखोल परिणाम होत असतो, त्यामुळे जर कामे विना अडथळा होत असतील तर आपल्या भोवताली सकारात्मक ऊर्जा व तशा गोष्टी आहेत असे समजावे, परंतु जर सर्व कामे सुरळीत करून देखील बिघडत असतील तर मात्र नकारात्मक, अशुभ ऊ’र्जा शक्ती वावरत असते.

नारळाचे झाड हे शक्यतो आपल्या शेतात असते पण काहीजण ते अंगणात देखील लावतात, शास्त्र सांगते की जर नारळाचे झाड आसपास असेन तर त्याचा परिणाम शुभ व अशुभ अशा दोन्ही प्रकारे होत असतो. यामध्ये काही व्यक्तीं साठी शुभ फळ देते तर काहींसाठी अशुभ फळ देते. यामध्ये ज्यांची रास वृषभ आहे किंव्हा तुळ आहे अश्या राशींच्या लोकांनी कोणताही विचार न करता आपल्या घरासमोर स्वताच्या हाथाने नारळाचं झाड अगदी अवश्य लावा.

वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीच प्रत्येक वस्तूच एक स्थान निश्चित केलेलं आहे. जर ती गोष्ट त्या विशिष्ट दिशेला असेल तरच त्या वस्तू पासून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आपल्यासाठी लाभदायक ठरते. या सकारात्मक ऊर्जेच्या बळावरच आपलं नशीब आपलं भाग्य चमकत असत. घराची बरकत होण्यासाठी नारळाचं झाड हे आपल्या घराशेजारी कुठे असावं याच शास्त्रात उत्तर आहे.

तुमच्या घरातील जी कमावती व्यक्ती आहे मुख्य व्यक्ती आहे ज्या व्यक्ती कडून धन, पैसा तुमच्या घरात येतो. त्या व्यक्तीची रास वृषभ किंवा तुळ असायला हवी. इतर व्यक्ती या मध्ये चालणार नाहीत. नारळाचं झाड जर तुमच्या घराशेजारी आहे आणि जर तुमच्या घराची प्रगती होत नाही किंव्हा तुमच्या घरावर वारंवार संकटे येत असतील. तर ते झाड चुकीच्या ठिकाणी आहे, थोडक्यात तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा जर वाढली असेल तर लक्षात घ्या तुमच्या घराशेजारी असणार नारळाचं झाड हे चुकीच्या दिशेस लावण्यात आलेलं आहे.

वास्तुशास्त्रामध्ये ही पाच झाडे आवर्जून लावा ज्यातून भरपूर शुभ ऊर्जा मिळते. पहिलं झाड तुळस, दुसरं हळद, तिसरी नारळ, चौथ दवणा आणि पाचवं लाजाळू. ही जी पाच झाडे आहेत यांना वास्तुशास्त्रामध्ये मनी प्लांटअसे म्हंटलेले आहे. म्हणजे भारतीय परंपरेनुसार ही झाडे ज्या घरासमोर असतील त्या घराची प्रगती होतेच . मात्र ही झाडे लावताना दिशेचा विचार फार निश्चित आहे.

शुभ आणि पवित्र झाडे लावताना जो खड्डा तुम्ही तयार कराल त्या खड्यामध्ये गाईचे कच्चे दूध, न तापवलेलं अस गो मातेचं दूध तुम्ही त्या खड्या मध्ये टाका सोबतच थोडास मध टाका आणि त्या नंतर हे झाड आपण लावायचं आहे. झाडे व्यवस्थित उगवतात सुद्धा आणि त्या पासून आपल्याला चांगले सकारात्मक परीणाम सुद्धा मिळतात. नारळाचं झाड ज्यांच्या घरासमोर असेल त्यांच्या जीवनात मोठ्या प्रमाणात मानसम्मान मिळतो. त्यांना समाजामध्ये मोठी प्रतिष्ठा असते.

वास्तुशास्त्रानुसार नारळाचं झाड हे आपल्या घराच्या पाठीमागे जी परस बाग आहे त्या ठिकाणी अति उत्तम मानलं जातं किंवा घरा जवळील गार्डनची जागा त्या ठिकणी सुद्धा आपण नारळाच झाड लावू शकतो. नारळाचं झाड लावण्यासाठी दक्षिण दिशा सर्वात चांगली आहे. दुसरी दिशा आहे पश्चिम दिशा. ज्या दिशेला सूर्य मावळतो. दोन दिशा पैकी एक.

या दोन दिशेना जर नारळाचं झाड असेल तर आपल्या घराला स्थैर्य लागत. पैसा येत असेल तर तो पैसा टिकून राहतो. घराची बरकत होऊ लागते. बऱ्याच वेळी अस होत की आपला उद्योग चांगला चालू लागतो पण मध्ये काही अशी संकटे येतात अश्या काही अडचणी येतात की मोठ्या प्रमाणात नुकसान होत.

पुन्हा गरिबी, दारिद्रय, या सर्व गोष्टी होऊ लागतात.यावेळी नारळाचं झाड हे नक्की या दोन दिशेला लावा. नारळाचं झाड जर तुमच्या पूर्व दिशेला असेल किंव्हा जर उत्तर दिशेला असेल किंव्हा या दोन दिश्यांची जी मधली दिशा आहे ती म्हणजे ईशान्य दिशा. जर या तीन दिशेना जर नारळाचं झाड लावलं असेल तर ही झाडे जर तुमच्या घराच्या उंचीपेक्षा मोठी असतील तर, या तीन दिशेला असतील तर बरकत होत नाही.

घराची प्रगती होत नाही. घरामध्ये सातत्याने भांडणे, वादविवाद, आणि आजारपण निर्माण होत. ही झाडे तुम्हाला काढून टाकायची असतील तर झाडे तो-डण्यासाठी काही विशिष्ट दिवस आहेत. हिंदुशस्त्राप्रमाणे भाद्रपद महिना आणि माघ महिना या दोन महिन्यांमध्ये चुकून सुद्धा झाडे तो’डू नयेत. उंच झाडे लावण्यासाठी पश्चिम दिशा आणि दक्षिण दिशा वास्तुशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानली जातात. आणि या दोन दिशा नारळाच्या झाडांसाठी अतीउत्तम आहे. अशा प्रकारे तुम्ही घरातील बरकत वाढवू शकता.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *