Festivals in month of September: नमस्कार मित्रांनो..Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!सप्टेंबर महिन्याची सुरुवात श्रावण कृष्ण द्वितीयाने होत असून त्यानंतर जन्माष्टमीसारखा मोठा सण येत आहे. हरतालिका आणि गणेश चतुर्थी सप्टेंबर महिन्यातच आहे तसेच, पितृ पक्षही या महिन्याच्या शेवटी सुरू होईल. सप्टेंबर महिन्यातील सर्व सण उत्सवाची तारीख आणि त्यांचे महत्त्व जाणून घेऊया.

संकष्ट चतुर्थी
भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी व्रत केले जाते. यावेळी ही शुभ तारीख ३ सप्टेंबर रविवार रोजी आहे. या तिथीचा संबंध श्रीगणेशाच्या जन्माशी आहे, त्यामुळे या दिवशी गणेशाची पूजा करावी.

श्रीकृष्ण जयंती आणि गोपाळकाल
यंदा बुधवार ६ सप्टेंबर रोजी जन्माष्टमी तर गुरुवार ७ (Festivals in month of September) सप्टेंबर रोजी गोपाळकाला साजरा केला जाईल. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमीला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात. शास्त्रात सांगितले आहे की, या दिवशी व्रत आणि विधीनुसार पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि संतती सुख प्राप्त होते. जन्माष्टमी म्हणजेच श्रीकृष्ण जयंती च्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात दहिहंडी म्हणजेच गोपाळकाला साजरा करतात.

दर्श-पिठोरी अमावस्या, पोळा
यंदा गुरुवार १४ सप्टेंबरला पोळा, पिठोरी अमावस्या असून, दर्श-पिठोरी अमावस्या आणि पोळा हे श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येते. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण असून, परंपरेनुसार या दिवशी (Festivals in month of September) बैलांची पूजा केल्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते.

हरतालिका तृतीया
यंदा सोमवार १८ सप्टेंबर रोजी हरतालिका असून, भाद्रपद महिन्यात गणेशाच्या आगमनापुर्वी एक दिवस अगोदर शुक्ल पक्षाच्या तृतियेला हरतालिका पुजन करण्यात येतं. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी हरतालिका तृतीया साजरी केली जाते. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात आणि अखंड सौभाग्याची कामना करतात.(Festivals in month of September)

गणेश चतुर्थी
यंदा १९ सप्टेंबरला गणेश चतुर्थी वर्त आहे. गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना करतात. या काळात रोज सकाळी व संध्याकाळी गणपतीची आरती म्हटली जाते. त्यांना मोदकांचा प्रसाद दिला जातो. ११ दिवसांनी म्हणजे अनंत चतुर्थीला मूर्तीचे नदीत किंवा तलावात विसर्जन केले जाते. १९८२ साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेश उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करायला सुरुवात केली.

ऋषीपंचमी
ऋषी पंचमी हिंदू धर्मातील सात ऋषींना समर्पित आहे. हे व्रत भाद्रपद महिन्यातील(Festivals in month of September) शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी पाळले जाते. या दिवशी सप्तऋषींची विशेष पूजा केली जाते. या दिवशी गंगेत स्नान करण्यासोबतच दान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की हे व्रत केल्यास पापांपासून मुक्ती मिळते. यंदा हे व्रत २० सप्टेंबरला आहे.

हेही वाचा:या तारखेपासून सुरू होणार पितृपक्ष, अशी आहे श्राद्धाच्या संपूर्ण तिथीची यादी

राधाष्टमी आणि गौरी विसर्जन
मान्यतेनुसार, राधेचा जन्म भगवान श्रीकृष्णाच्या जन्मानंतर १५ दिवसांनी झाला होता. भाद्रपद शुक्ल अष्टमीच्या दिवशी महालक्ष्मी व्रत देखील पाळले जाते. हे व्रत केल्याने धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. तसेच स्त्रिया आपल्या मुलांच्या आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करू शकतात. यावर्षी हे व्रत २३ सप्टेंबरला आहे. याच दिवशी गौरी विसर्जनही होईल.(Festivals in month of September)

परिवर्तिनी एकादशी
भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला श्रीविष्णू शयनावस्थेत असताना कूस बदलतात. यामुळे विष्णूंच्या स्थानात बदल होतो, म्हणून या एकादशीला परिवर्तिनी एकादशी असे संबोधले जाते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. यंदा २५ सप्टेंबरला परिवर्तिनी एकादशी असून, २६ सप्टेंबरला भागवत एकादशी आहे.

अनंत चतुर्दशी
अनंत चतुर्दशी नावाप्रमाणेच हे चतुर्दशी तिथीला साजरे केले जाते. भाद्रमासाच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी अनंत चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते. यावेळी २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, या दिवशी भगवान श्रीहरीच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते आणि त्यानंतर लोक त्यांच्या हातात अनंत बांधतात. अनंत चतुर्दशीचे व्रत केल्याने माणसाची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतात असा समज आहे.(Festivals in month of September)

महालयारंभ
हिंदू पंचागानुसार पितृ पक्ष हा साधारण १६ दिवसांचा असतो. पितृ पक्ष किंवा श्राद्ध भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला सुरू होते आणि अश्विन महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी समाप्त होते. पितृ पक्षात पितरांप्रती आदर व्यक्त केला जातो. पितृपक्षात पिंडदान वगैरे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जाते. २९ सप्टेंबरपासून पितृ पक्ष सुरू होणार आहे.(Festivals in month of September)

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेजकोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया Marathi Duniya आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *