मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक रूढी परंपरा पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत आणि आजही या रूढी परंपरांचे बरेच जण पालन देखील करीत असतात. परंतु काही जण अंधश्रद्धा म्हणून देखील सोडून देतात. तर आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते आणि काही वेळेस काय होते की भरपूर मेहनत घेऊन कष्ट घेऊन देखील आपल्या या इच्छा पूर्ण होत नाहीत आणि मग त्यावेळेस आपण आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण अनेक देवी देवतांना नवस बोलत असतो.

म्हणजे माझी मनातील इच्छा किंवा जे काही तुमचे काम असेल ते काम पूर्ण होऊ दे आणि मग मी काही ना काही अर्पण करेन म्हणजे पाच नारळाचे तोरण भांधेन किंवा आहेर करेल असं काहीही नवस बोलत असतो. परंतु आपल्या मनातील इच्छा पूर्ण झाल्यानंतर हा नवस फेडायचा देखील असतो आणि परंतु आपल्या मनामध्ये तो नवस लक्षात न राहिल्या कारणाने आपला तो नवस बोललेला तसाच राहतो.

म्हणजेच आपल्याला आठवणही राहत नाही की आपण कोणत्या देवीला किंवा कोणत्या देवतेला कोणता नवस बोललेलो आहोत किंवा बऱ्याच वेळा काय होते की आपल्या परिस्थितीमुळे आपण काही वेळेस नवस फेडू शकत नाही. म्हणजेच आपण आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या मनात जे येईल जे आपणाला शक्य नसेल असा देखील आपण नवस बोलतो आणि मग आपल्या परिस्थितीमुळे आपणाला तो नवस फेडता येत नाही.

परंतु मित्रांनो आज मी तुम्हाला नवस जर फेडायचा तुमच्या हातून राहिलेला असेल तर तो नवस कसा फेडायचा याविषयी सांगणार आहे. मित्रांनो देव हा कधीही आपल्या भक्तांवरती रागवत नाही किंवा कोपत नाही. त्यामुळे जर तुमचा जर एखादा नवस फेडायचा राहिला असेल आणि त्यामुळे तुम्ही खूपच निराश असाल तर तुम्ही अजिबात निराश होऊ नका.

देव कधीही आपल्या भक्तांवर कोपत नाही. जर तुम्हाला नवस माहीतच नसेल किंवा तुमच्या परिस्थितीमुळे तुम्हाला तो नवस फेडणे शक्य नसेल तर घाबरून जाण्याचे काही कारण नाही एक तुम्हाला छोटीशी पद्धत मी सांगेन आणि या पद्धतीने तुम्ही आपल्या देवाला नवस फेडू शकता. परंतु मित्रांनो जर तुमची परिस्थिती असेल आणि तुम्ही नवस फेडत नसाल तर मात्र ही चुकीची गोष्ट आहे.

जर तुमची तशी परिस्थिती नसेल तर मात्र अशा पद्धतीने तुम्ही नवस फेडू शकता किंवा जर नवस बोललेला तुमच्या लक्षात राहिलेला नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही फेडू शकतात. तर मित्रांनो तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि तुम्ही ज्या देवाला नवस बोललेला आहे त्यांच्या मंदिरामध्ये जायचे आहे. जर तुमच्या पूर्वजांनी एखाद्या नवस बोलला असेल किंवा तुम्ही बोलला असेल परंतु कोणत्या देवाला आपण नवस बोललेला आहे हे लक्षात राहिलेले नसेल तर तुम्ही एक नारळ घेऊन कोणत्याही मंदिरात देवाच्या मंदिरामध्ये जाऊ शकता.

तिथे गेल्यानंतर दोन्ही हातामध्ये आपल्याला नारळ घ्यायचा आहे आणि आपल्या भगवंताला प्रार्थना करायचे आहे की, हे भगवंता मी तुझा अपार भक्त आहे. माझ्या पूर्वजांनी किंवा मी जो नवस बोललेला आहे तो माझ्या परिस्थितीमुळे मी तुम्हाला तुमचा हा नवस फेडू शकत नाही. परंतु ही माझी छोटीशी भेट तुम्ही अगदी आनंदाने स्वीकार करा आणि तुमचा कृपाशीर्वाद सदैव माझ्या डोक्यावर ठेवा. माझ्या हातून काही चुका झाल्या असतील तर माफ करा.

असे फक्त तुम्ही म्हणायचे आहे आणि तो नारळ तुम्ही त्या मंदिरांमध्ये अर्पण करायचा आहे. म्हणजेच तो नारळ तुम्हाला फोडायचा नाही. अशा पद्धतीने तुम्ही आपले नवस फेडू शकता. परंतु नवस जर तुम्ही नाही फेडला तर त्याचे कोणतेही वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागणार नाहीत परंतु तुमच्या लक्षात असूनही जर तुम्ही नवस खेळत नसाल तर मात्र हे चुकीचे आहे किंवा तुमची परिस्थिती तशी नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने नवस करू शकता आणि आपल्या देवी देवतांना प्रसन्न करून घेऊ शकता.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *