नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! आपण ज्या वस्तू परिधान करतो त्या प्रत्येक वस्तूच स्वतःच एक आगळ वेगळ वैशिष्ट्य आहे महत्त्व आहे. आपण अनेक लोकांच्या पायात किंवा हातामध्ये काळा धागा काळा दोरा बांधलेला पाहिलेला असेल. मित्रांनो हा धागा शक्यतो नजर दोष किंवा कोणतीही बाधा होऊ नये यासाठी बांधला जातो. मात्र लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी लाल रंगाचा रेशमी धागा रेशमी दोरा अनेक लोक बांधतात.

आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये. मात्र केवळ हा धागा बांधल्याने लक्ष्मी आकर्षित होत नाही. त्याची एक विशिष्ट विधी असते. आज हीच विधी आपण जाणून घेणार आहोत. विधी म्हणजे काय? तर हा धागा नक्की कोणत्या दिवशी बांधावा, कोणत्या वारी बांधावा, वेळ कोणती असावी आणि हा धागा बांधताना कोणत्या या मंत्रांचा जप करणे आवश्यक असत. जेणेकरून हा धागा सिद्ध बनेल आणि लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होईल.

मित्रांनो आज आपण हा उपाय पाहणार आहोत यासाठी शुक्रवारचा दिवस किंवा रविवारचा दिवस अतिउत्तम राहील. तुमची इच्छा असेल तर तुम्ही आठवड्यातील कोणत्याही वारी हा उपाय करू शकता. मात्र रविवार आणि शुक्रवार हे अत्यंत शुभ वार आहेत हा उपाय करण्यासाठी. कारण रविवार प्र त्य क्ष सूर्य देवतेचा वार आहे. सूर्य देव की, जे जीवनामध्ये यश प्राप्त करून देतात, जीवन उज्ज्वल बनवतात, जीवनामध्ये चैतन्य निर्माण करतात.

हा उपाय केवळ धनप्राप्तीसाठी नव्हे म्हणजे पैसा प्राप्त करण्यासाठीच नव्हे तर जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त करायचे असेल, सफल व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तरीसुद्धा आपण करू शकता. कार्यक्षेत्रांमध्ये यामुळे यश नक्की मिळत. सोबतच समाजामध्ये मान-सन्मान प्रतिष्ठा सुद्धा वाढते. शुक्रवारचा दिवस यासाठी महत्त्वाचा आहे की, हा वार माता लक्ष्मीचा वार आहे की, जी धनाची अधिपती देवता आहे.

जर लक्ष्मीची कृपा असेल तर जीवनातून गरिबी नक्की निघून जाते. पैसा धन, वैभव, ऐश्वर्य प्राप्त होऊ लागतात. मित्रांनो दोन वार सांगितले शुक्रवार किंवा रविवार. मात्र आपण आपल्या सोयीनुसार इतर वार सुद्धा निवडू शकता. हा उपाय करण्यासाठी सकाळची वेळ ही सर्वोत्तम असते. जेव्हा सूर्य उगवत असेल, सूर्योदय होत असेल. आपल्या भागामध्ये सूर्योदय कधी आहे हे लक्षात घ्या आणि सकाळी आठ साडे आठ वाजायच्या आत हा उपाय आपण नक्की करा.

यासाठी जो धागा, जो दोरा आपल्याला आवश्यक आहे. तो लाल रंगाचा रेशमी धागा रेशमी म्हणजे सिल्क कॉटनचा घेऊ नका. लाल रंगाचा रेशमी धागा आपल्याला आवश्यक आहे. आपल्या हाताच्या लांबी इतका म्हणजे आपल्या बोटांपासून ते आपल्या जे शोल्डरस आहेत जो खांदा आहे तिथपर्यंत इतक्या लांबीचा धागा आपण घ्यायचा आहे. सोबतच सूर्य देवांचे पूजन सुद्धा आपण करणार आहोत अगदी छोटस पूजन आहे एक दोन मिनिटांच.

तर आपण सकाळी शुक्रवारी किंवा रविवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वीचा एक ते दीड तासांचा कालावधी थोडक्यात सूर्योदय होण्यापूर्वी उठा स्वच्छ स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर आपण सूर्य देवांकडे पाहत म्हणजे पूर्व दिशेकडे पाहत जेव्हा सूर्य उगवत असेल तेव्हा तांब्याभर जल, तांब्याभर पाणी सुर्यदेवांना अर्पण करा. अर्ग्या म्हणून अर्पण करा.

अर्पण करताना ओम सूर्याय नमः ओम सूर्याय नमः ओम सूर्याय नमः किंवा सूर्य देवतेच्या कोणत्याही मंत्रांचा जप आपण करू शकता. हे पाणी आपण अर्पण करायच आहे. लक्षात ठेवा अर्ग्यानअर्पण करताना त्या तांब्यात थोडंसं पाणी शिल्लक ठेवा. ते आपल्याला नंतर आवश्यक असणार आहे. अर्ग्या अर्पण करून झाल्यानंतर आपण सूर्य देवांना हळदी कुंकू व्हायचं आहे. 2 अगरबत्ती लावायचा आहेत. एक दिवा प्रज्वलित करायचा आहे.

काही फुले आपण अर्पण करू शकता शक्यतो लाल रंगाची फुले अर्पण करा आणि त्यानंतर जो धागा आहे हा धागा आपण आपल्या उजव्या हातात घ्यायचा आहे. आपल्या उजव्या हातात हा धागा घ्यायचं आहे. आपण जे जल सूर्य देवांना अर्ग्या म्हणून अर्पण केलं होतं हे थोडंस जल या धाग्यावरती शिंपडायचं आहे आणि हा धागा आपल्या उजव्या हातात घेऊन ती मूठ बंद करून उजव्या पायावर उभा राहून या मंत्राचा आपण जप करायचं आहे.

लक्षात घ्या उजव्या पायावर म्हणजे एकाच पायावर आपण उभं करायच आहे. जे शारीरिक दृष्ट्या सक्षम नाहीत असे लोक आपल्या दोन्ही पायावरती उभे राहू शकता काही अडचण नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी केवळ एका पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करा. शक्य नसेल तर दोन्ही पायांवर उभं राहू शकता. अशाप्रकारे ही मूठ बंद करून एक मंत्र सांगत आहे या मंत्राचा 108 वेळा आपण जप करायचं आहे. आणि जर हा जप करत नाहीत मित्रांनो जप केल्यामुळे वस्तू प्रभारित होते वस्तू अभिमंत्रित होते. त्या वस्तूमध्ये सामर्थ्य, क्षमता, ताकद निर्माण होते पावर येते.

मंत्र आहे ओम नमो भगवते सुर्याय आदित्याय भास्कराय नमो नमः मित्रांनो या मंत्राचा आपण 108 वेळा जप करायचंआहे. जप करून झाल्यानंतर मनोभावे सूर्य देवतेस वंदन करायचं आहे, नमस्कार करायचं आहे. आणि तुमची जी इच्छा आहे मनोकामना आहे की, जीवनामध्ये यश मिळू देत, जीवनामध्ये सफलता मिळू देत, धन वैभव ऐश्वर्य येऊ देत. धन समस्या दूर होऊन घराची भरभराट होऊ देत.

अखंड लक्ष्मीची प्राप्ती होऊ देत. अशी प्रार्थना आपण सूर्यदेवतेस करायची आहे आणि हा जो धागा आहे हा धागा आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्यात आपण परिधान करायचं आहे घालायचं आहे. आता या धाग्याची लांबी खूप जास्त आहे. अशावेळी आपण हा धागा व्यवस्थित गुंडाळा. व्यवस्थित गुंडाळ्यानंतर गाठ मारा. हे सर्व करत असताना ओम सूर्याय नमः ओम सूर्याय नमः ओम आदित्याय नमः ओम भास्कराय नमः ओम दिनकराय नमः अशा कोणत्याही सूर्य देवतांच्या मंत्रांचा जप करू शकता.

मित्रांनो हा धागा परिधान केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की, कंटाळा थकवा निघून जात आहे. एक प्रकारचे चैतन्य उत्साह व तरतरी तुमच्यात निर्माण झालेली आहे. लक्षात घ्या हा धागा रेशमी असावा आणि तो परिधान करण्याची ही जी विधी आहे या विधीचे तंतोतंत पालन करा

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *