नमस्कार मित्रांनो.. “Marathi Duniya” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो, स्वामी समर्थ महाराजांची लीला अगाध असल्या चा प्रत्यय अनेकांना आला आहे. आजच्या काळातही स्वामींचे अनुभवलेली माणसं हजारोंच्या संख्येने आप ल्याला पाहायला मिळतील. स्वामींच्या कृपेचा कृतकृत्य भाव प्रत्येकाच्या बोलण्यात वागण्यात असल्याचे प्रकर्षाने दिसून येते.

स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांना वेळोवेळी मदत केल्याचे दिसून येते. अनेक कथा अनुभव यातून स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीही एकटे पडू देत नसत हेच स्पष्ट होते.

नाशिक येथील सायली ताईंचा अनुभव आपण जाणून घेणार आहोत, ताई सांगतात माझे नाव सायली मी नाशिकला राहते मला स्वामींच्या सेवेचा नाद आहे माझी आई ही स्वामींचे सेवेकरी आहे आणि मला देखील तिच्या मुळे स्वामींच्या सेवेचा छंद लागला.

सुरुवातीला मी आईसोबत सहज जात होते पण हळूहळू मला इतकी गोडी लागली की मला स्वामींच्या केंद्रात गेल्या शिवाय करमतच नाही मला स्वामींनी अनेक वेळा आधार दिलेला आहे माझा हा अनुभव याच वर्षी चा आहे जानेवारी महिन्यामधील आहे. गेले अनेक वर्ष आमच्या कुटुंबाला खूप वाईट गेले आहेत.

आणि गेले वर्षभर अनेक गोष्टींनी वाईट असेच गेले आम च्या नात्यांमधल्या अनेक लोकांना आम्ही गमावलं कोरो नाने जगणे अत्यंत कठीण करून टाकले होते कधी नव्हे इतकी वाईट परिस्थिती झाली होते खाण्या पिण्या पासून सगळ्याच गोष्टींचे हाल झाले होते पण स्वामींवर भार टाकून आम्ही कसेबसे दिवस काढले कोरोना संपला आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील असं वाटायला लागले होते माझे पती नोकरीवर देखील जायला लागले होते

एके दिवशी दुपारीच ते घरी परतले निस्तेज चेहऱ्याने ते बसले तेव्हाच माझ्या मनात धस्स झाली स्वामींना हात जोडले पण जे व्हायचे ते आधीच झाले होते कोरोना मुळे त्यांच्या कंपनीचे अक्षरश: दिवाळे निघाले होते आणि माझ्या पतींना कामावरून कमी करण्यात आले होते ती रात्र आम्ही नवरा-बायकोनी कशी काढली आम्हालाच माहिती झोपलेल्या लेकरांना चोंभाळत आम्ही आमचे भंगलेले स्वप्न मोजत बसलो होतो स्वामीच्या भक्तांना परीक्षा द्यावीच लागते का?

मी मनोमन स्वामींना विचारले आणि मग ठरवले स्वामी तुम्ही जी परीक्षा घ्यायला घ्यायला तुमचे भक्त समर्थ आहेकोरना मुळे त्यांच्या कंपनीचे अक्षरश: दिवाळे निघाले होते आणि माझ्या पतींना कामावरून कमी करण्यात आले होते ती रात्र आम्ही नवरा-बायकोनी कशी काढली आम्हालाच माहिती. झोपलेल्या लेकरांना चोंभाळत आम्ही आमचे भंगलेले स्वप्न मोजत बसलो होतो स्वामीच्या भक्तांना परीक्षा द्यावीच लागते का?

मी मनोमन स्वामींना विचारले आणि मग ठरवले स्वामी तुम्ही जी परीक्षा घ्यायला घ्यायला तुमचे भक्त समर्थ आहे ,तुम्हीच आम्हाला समर्थ बनवले आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांना घेऊन केंद्रात गेले. पुढचे तीन दिवस आम्ही गुरुचरित्राचे पारायण करत होतो त्या दिवशी आमचे पारायण संपले आणि काय च’मत्कार

दुसऱ्या दिवशी सकाळीच यांना एक कॉल आला यांना मुलाखतीसाठी बोलावले होते काही दिवसांनी त्यांची मुलाखत होती स्वामींना साकडे घालून ते मुलाखतीला गेले मुलाखत चांगली झाली आणि त्यांना नोकरी देखील लागली स्वामी महाराजांना आमच्या प्रपंचाची इतकी काळजी होती की अवघ्या दहा दिवसात पहिल्या नोकरीपेक्षा अधिक चांगली नोकरी त्यांनी आमच्या पदरात घातली. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *