नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! निळावंती एक असे पुस्तक आहे ज्याच्या विषयी अनेक चुकीच्या अफवा पसरवल्या जातात. असे सांगितले जाते कि निळावंती ग्रंथाच्या वाचनाने लोक वेडे होतात इत्यादी. निळावंती या ग्रंथाविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यातील पहिला गैरसमज म्हणजे या ग्रंथाच्या वाचनाने मृत्यू येतो.

लोकांच्या मते या ग्रंथात पशु पक्षी ह्यांची भाषा समजण्याचे ज्ञान आहे आणि हे ज्ञान घेण्यासाठी काही तरी त्याग करावा लागतोच. स्वामी विवेकानंद यांचा अकाली मृत्यू या पुस्तकाच्या वाचनाने झाला. या पुस्तकाची संपूर्ण कथा कधीही ऐकू नये किंवा सांगणाऱ्याने सांगू नये. भारत सरकारने या ग्रंथाचे मुद्रण बंद केले आहे. अश्या अनेक अफवा पसरवल्या जातात. या ग्रंथातील ज्ञानाने पशुपक्षी आणि परग्रहावरील लोकांशी संवाद साधला येतो असे सांगितले जाते.

त्यांच्याबद्दल असेही म्हटले जाते की स्वामी विवेकानंदांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणांत समाधी घेतली. ज्योतिष आनंद कुलकर्णी यांनी एका खासगी कार्यक्रमात 1998 या पुस्तकावरती एक गोष्ट सांगितली. एकदा एक श्रीमंत माणूस एका वाटेवर जात असताना त्याची बैलगाडी मो-डते आणि रात्री त्याच्यावर द रो डे खो र ह-ल्ला करतात. जीव वाचवण्यासाठी तो जंगलातून पळत राहतो आणि एके ठिकाणी तो बेशुद्ध पडतो.

सकाळी जाग येते तेंव्हा एक सुंदर तरुणी त्याची काळजी घेत असते. तिच्या सौन्दर्यावर तो त्वरित मोहित होतो. तिच्या शु श्रु ते ने तो बरा होतो आणि त्या मुलीने आपल्याबरोबर लग्न करून घरी यावे अशी इच्छा व्यक्त करतो. इथे ती मुलगी त्याला आपले नाव निळावंती असे सांगते. तिच्या अनेक अटी सुद्धा असतात.

उदाहरणार्थ रात्री ती त्याच्या सोबत झोपणार नाही आणि रात्री ती कुठे जाईल ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न त्याने करू नये. तो अटी मान्य करतो. अश्या पद्धतीने निळावंती गावात येते. तिचे सौंदर्य सर्वानाच दै’वी वाटते. निळावंती प्रत्येक रात्री शयन कक्षातून उठून बाहेर जाते.

निळावंती एक अतिशय दुर्मिळ प्रकारची यक्षिणी असते आणि पृथीवर अडकलेली असते. पुन्हा आपल्या लोकांत पोचण्यासाठी तिला काही तरी गूढ ज्ञान आवश्यक असते म्हणून रात्रभर भटकून ती आ-त्मे, भुते, इतर यक्ष, इत्यादींकडून माहिती गोळा करते आणि लिहून काढते.

हजारो वर्षे हेच केल्याने तिच्याजवळ अनेक गूढ विद्या असतात. अर्थांत इतर भुते, सिद्ध, आ-त्मे इत्यादी हे ज्ञान फुकट देत नाहीत. या ज्ञानासाठी तिला काही ना काही त्याग करावा लागतोच. कधी कुणा प्राण्याचा ब ळी तरी कधी मोठे हवन तर कधी स्वतःचे रक्त तिला द्यावे लागते.

जेव्हा निळावंती झोपलेली असते तेव्हा काही आवाज येतो. जेव्हा ती जागी असते तेव्हा तिला एक कोल्हा दिसतो, तो तिला सांगतो की नदीपात्रात एक प्रेत पडले आहे आणि त्याच्याकडे खजिना आहे. हे ऐकून निळावंती घराबाहेर पळत त्या प्रेताकडे जाते. त्या प्रेताच्या कंबरेला गाठी असतात, त्या हाताने सुटत नाहीत म्हणून ती तोंडाने सोडण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात तिचा पती येतो.

त्याला वाटते की निळावंती प्रेत खात आहे म्हणून तो तिला घरा बाहेर काढतो. निळावंती अशीच एक मुलगी होती. तिला सर्व प्राण्यांची आणि पक्ष्यांची भाषा माहित होती, तिला त्यांच्याशी संवाद साधायला येत होता. निळावंती ग्रंथाच्या प्रति बाजारांत उपलब्ध नाहीत कारण मुळांतच हे एक पुस्तक नाही.

काळाच्या ओघांत निळावंती ग्रंथाच्या अनेक प्रति निर्माण झाल्या आणि त्यांत बदलावं सुद्धा झाले आहेत. हे ज्ञान गुप्त स्वरूपाचे असल्याने गुरु शिष्य परंपरेतूनच ते दिले जाते. खेड शहराच्या जवळ चाकदेव म्हणून गांव आहे इथे पपू घारनाथ गुरुजी राहतात. त्यांच्याकडे निळावंती ग्रंथाची २ जुनी ताडपत्रे आहेत पण त्यावरील भाषा कुणालाही येत नाही

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *