धनु राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष २०२४ चांगल ठरणार आहे. कसा चांगला ठरणार आहे अविवाहितांचे लग्न ठरतील. नोकरदार आणि व्यापाऱ्यांना भरपूर लाभ मिळतील. नोकरदारांना पदोन्नतीसह मोठी जबाबदारी मिळू शकते. सगळ्यात महत्त्वाच धनु राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासामध्ये वाढ झालेली २०२४ मध्ये पाहायला मिळेल. व्यापारामध्ये सुद्धा खूप चांगला फायदा होण्याचे योग आहेत. वैवाहिक आयुष्य ही आनंदी असेल.

धनु राशीच्या लोकांना ज्या कार्यक्षेत्रात ते काम करत आहेत त्या कार्यक्षेत्रामध्ये अपार यश पद प्रतिष्ठा सन्मान हे सगळं मिळणार आहे. आणखीन कोणत्या चांगल्या गोष्टी धनु राशीच्या आयुष्यात २०२४ मध्ये घडणारे काही नुकसान होणार आहे का? चला जाणून घेऊया. मंडळी धनु राशीचे लोक तस तर खूप चांगले आणि आनंदी स्वभावाचे असतात हे लोक त्यांच्या प्रभावशाली आणि असाधारण व्यक्तिमत्वाने आणि स्वभावाने इतरांना आपल्याकडे आकर्षित करतात.

या राशीतील लोक महत्वकांक्षा आणि प्रेरणादायी ठरतात. ते आपल काम उत्साहाने आणि धैर्याने पार पाडतात. या राशीचे लोक बोलण्यापेक्षा कृती करण्यावर जास्त विश्वास ठेवतात. ही लोक प्रामाणिकपणाला महत्त्व देतात आणि निष्ठेबद्दलही खूप आदर करतात. आता २०२४ मध्ये धनु राशीची आर्थिक स्थिती कशी असणार आहे ते बघूया आर्थिक दृष्टिकोनातून वर्षाची सुरुवात धनु राशीला अनुकूल राहील. उत्पन्न चांगल राहील पण फक्त एप्रिल नंतर काही खर्च उद्भवतील ज्यामुळे बजेट बिघडू शकत. जर तुम्ही कोणाला पैसे दिले तर ते परत मिळण्याची फारशी शक्यता यावर्षी नाही.

त्यामुळे कोणालाही उधार देऊ नका. करिअरच्या बाबतीत बोलायच झाल तर नोकरी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वर्षाच्या सुरुवातीला उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. विशेषतः नोकरदार लोकांसाठी हे वर्ष पगार वाढ पदोन्नतीच्या दृष्टीने चांगला आहे. तुमच्या कामाची प्रशंसा होईल करिअरमध्ये स्पष्टता दिसून येईल. यावर्षी तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू केल तर त्यातही यश मिळणार आहे. एप्रिल नंतर तुमच्या व्यवसायात जरा चढ-उतार बघायला मिळतील.

पण एकंदरीतच यावर्षी कोणत्याही काम तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारच असेल. तुमचा नशीब ऐवजी मेहनतीवर विश्वास असेल.जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत किंवा व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी मे २०२४ नंतरचा काळ चांगला आहे.

कुटुंबाबद्दल बोलायच झाल तर कुटुंबामध्ये संमिश्र परिणाम पाहायला मिळतील. संमिश्र म्हणजे कुछ खट्टा कुछ मीठा अशा प्रकारचा वातावरण राहील.व्यस्त वेळापत्रकामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ देऊ शकणार नाही. पण त्यांना विवाहित आहे त्यांना संतती सुख यावर्षी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलांसाठी या वर्षाची सुरुवात अनुकूल आहे. मुलांच्या दृष्टीने विचार करतात त्यांना शिक्षणामध्ये रुची वाढेल. विवाह योग्य मुलांची लग्नही ठरण्याची शक्यता आहे. एप्रिल नंतर काळ थोडासा प्रतिकूल होऊ शकतो.

कारण प्रकृती बिघडू शकते. आणि कौटुंबिक वातावरणात थोडा तणाव येऊ शकतो. पण तुम्ही तेवढा समतोल राखला तर वर्ष चांगलं जाईल. आरोग्याच्या दृष्टीने बोलायचे झाल तर शारीरिक दृष्ट्या तुम्ही समाधानी रहाल. करण निरोगी राहाल. एप्रिलनंतर संसर्गजन्य रोग किंवा पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तेव्हा थोडी सावधानता बाळगा. आता विद्यार्थ्यांसाठी किंवा जे स्पर्धा परीक्षा देत आहेत. त्यांच्यासाठी हे वर्ष चांगल असणार आहे.

उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा यश मिळण्याचे योग आहेत. मात्र मेहनत मात्र करावी लागेल. एप्रिल पर्यंतचा काळ खूप अनुकूल आहे त्यामुळे यावेळी तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेला बसलात किंवा स्पर्धा परीक्षा दिली तर यश मिळण्याची शक्यता आहे.

मंडळी धनु राशि अग्नी तत्वाची रास आहे. गुरु या राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या व्यक्तींचा स्वभाव जरी तापट असला तरी यांना यांच्या रागावर नियंत्रण ठेवता येत. म्हणजे राग कुठे कशा पद्धतीने व्यक्त करायचा हे यांना चांगले माहिती असत. संतापाच्या भरात अविवेकी पाऊल शक्यतो ही लोक उचलत नाहीत.

पण रागाचा योग्य तो वापर स्वतःसाठी करून घेणे यांना चांगल माहिती असत. एखाद्या गोष्टीबद्दल चिकाटी धनु राशीमध्ये पाहायला मिळते. म्हणजे एखाद्या गोष्टीचा पाठ पुरावा करून ती गोष्ट मिळवणं किंवा साध्य करण यासाठी जी क्षमता लागते ती गोष्ट धनु राशीकडे असते. आपल्या ध्येयप्रती एकाग्रता यांना चांगली साधलेली असते. आणि म्हणूनच हे त्यांच्या कार्यक्षेत्रात यशस्वी होतात.

त्यांचे एकाग्रता आणि एखाद्या गोष्टीवर फोकस असण त्यांच्या प्रगतीच सिक्रेट म्हणाव लागेल. पण हो त्याचबरोबर धनु राशीच्या लोकांना थोडासा अहंकाराचा वाराही लागतोच. तेवढा त्यांनी कंट्रोल केला तर त्यांच्या प्रगतीचे घोडे कोणीही अडवू शकत नाही.

आपल्या इगो च्या नादात आपण आपल नुकसान करून घेत नाही ना याकडे धनु राशीच्या लोकांनी २०२४ मध्ये लक्ष द्यायच. धनु राशीच्या चांगल्या बाजू म्हणजे या व्यक्ती बुद्धिमान असतात. अतिशय बोलकेपणा विनोद वृत्ती आणि आकर्षक व्यक्तिमत्व यांच्या मधले सकारात्मक मुद्दे आहेत. धनु व्यक्ती कोणाशी सहसा वैर करत नाही.

परंतु त्यांचा स्वाभिमान डिवसला गेल्यास त्या उग्ररूप धारण करतात. त्याचबरोबर धनु राशीचा आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तत्वपालनात तडजोड यांना चालत नाही. धनु राशीच्या व्यक्तींची स्वतःची आणि त्या तत्त्वांची तडजोड हे कोणत्याही परिस्थितीत करत नाही.

गुरु ग्रहाचे स्वामी त असल्यामुळे मिळेल तिथून ज्ञान वेचण्याचा हव्यास यांना असतो. अन्यायाविरुद्ध परिणामाची परवा न करता प्रथम जर कोणी उभ राहत असेल तर ती धनु राशीची व्यक्ती आहे. धनु राशीच्या व्यक्ती कित्येक वेळा सरस्वतीच्या कृपाप्रसादाचा फळ अनुभवीत असतात.

धनु राशीच्या व्यक्तींनी एकाच गोष्टीकडे लक्ष देण्याची आवश्यकता असते. मी मगाशी म्हटल तस या स्वाभिमानी असतात पण स्वाभिमान हा अहंकाराकडे तर जात नाहीये ना स्वाभिमानाचा अहंकारात परिवर्तन तर होत नाहीये ना या गोष्टीकडे धनु राशीच्या व्यक्तींनी कायम लक्षात द्यायचा असत.

धनु राशीची लोक उत्तम लेखक कलावंत वक्ता संस्थाप्रमुख तसेच कुटुंबाला आधार देणारे आणि संरक्षण देणारे असे लोक असतात. त्यांचा आपल्या घरावर प्रेम असतं आणि गृह सौख्यासाठी ही लोक कायम हव ते करायला तयार असतात.

धार्मिक बाबतीत सुद्धा धनु राशीच्या व्यक्ती श्रद्धावान असतात. परंतू अंधश्रद्धेला यांच्याकडे थारा नसतो. कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याची वृत्ती यांच्याकडे असते. खोटारडेपणाचा निकाल लावल्याशिवाय धनु राशीच्या व्यक्ती स्वस्त बसत नाहीत.

खोटे यांना चालत नाही. धनु राशीच्या व्यक्ती या मोठ्यांचा आदर करणाऱ्या घरातल्या ज्येष्ठांचा सांभाळ करणाऱ्या अशा असतात. त्यामुळे घरातील ज्येष्ठ धनु राशीच्या व्यक्तींवर खुश असतात. आता धनु राशीच्या व्यक्तींना २०२४ मध्ये ज्या काही थोड्याफार अडचणी येणार आहेत त्या अडचणींवर ज्योतिषीय उपाय सुद्धा आहेत.

उपाय: १) त्यांनी कुठल्याही धार्मिक ठिकाणी किंवा मंदिरात केळी किंवा बेसनाचे लाडू दान करावे. २) त्याचबरोबर दर शनिवारी संध्याकाळी काळे तीळ आणि मोहरीचे तेल शनि देवांना अर्पण करून ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा. ३) रक्तदानातही सहभागी तुम्ही होऊ शकता हे उदात्त कार्य केल्यामुळे तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यास तुम्हाला मदत मिळेल.

४) अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रमांना डाळी आणि कपडे दान दिल्याने सुद्धा तुम्हाला लाभ होईल.दानधर्म करा. कुठलाही एक उपाय करा परंतु सातत्याने करा. धनु राशीसाठी येणारा वर्ष नक्कीच चांगला आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *