नमस्कार मित्रांनो,

हिंदू ध र्म शास्त्र आणि पुरातन काळापासून चालत आलेल्या परंपराना विशेष महत्व आहे. महर्षी वेदव्यास यांनी गरुड पुरणाची रचना केली होती. यात मानवी जीवनातील अगणित रहस्यांच वर्णन केलं गेलं आहे. मनुष्याला जीवनात कोणत्या गोष्टी उपयुक्त आहेत या सर्व गोष्टींची माहिती त्यात आहे.

आणि त्याच पुराणामध्ये आशा लोकांच्या घरी चुकूनही जेवू नका किंवा काहीही खाऊ नका असे सांगण्यात आले आहे. तर चला जाणून घेऊ या कशा लोकांच्या घरी चुकूनही जेवू नये. आपले पूर्वज लगेच कोणाकडे ही जेवायला जात नसत. ज्या ठिकाणी जेवायला बोलवलं आहे तिथेच अन्न परीक्षा घेतल्याशिवाय जेवू नये.

असे काही नियम आपले पूर्वज कटाक्षाने पाळत असत मात्र ह ल्ली अस होत नाही. आताच्या काळात आपण कसलाही विचार न करता आवडती वस्तू दिसली की पटकन तोंडात टाकतो. आणि नंतर त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात. म्हणून स्वतःच्या घरी सोडून बाहेर कुठेही जेवताना किंवा काहीही खाताना गरुड पुराणात दिलेले नियम आपण पाळत आहोत की नाही याकडे लक्ष द्यायला हवं.

माणूस ज्या प्रकारचे भोजन ग्रहण करतो तसेच त्याचे विचार तयार होतात. म्हणून अन्न ग्रहण करताना काही नियम कटाक्षाने टाळायला हवेत.
जर एखाद्या व्यक्तीचे चरित्र चांगले नसेल आणि या गोष्टीची आपल्याला पूर्वकल्पना असेल. तर आशा व्यक्तीच्या घरी कधीही जेवू नका. असे केल्यामुळे तुम्ही सुद्धा अप्रत्यक्षपणे त्याच्या पापात सहभागी होता.

तसेच जे लोक दुसऱ्याला लुबाडून धन संपती कमावतात. आशा लोकांची संगत आणि सहभोजन टाळा. आजारी व्यक्तीच्या घरी सुद्धा जेवू नये. आजारी व्यक्तीच्या घरी आजाराच्या प्रादुर्भावामुळे सं-सर्ग होण्याची दाट शक्यता असते. जे लोक इतरांचे चुगल्या करतात त्यांच्या मागे नाव ठेवतात. आशा लोकांच्या घरी सुद्धा जेवू नये.

कारण या लोकांचे विचार हीन दर्जाचे असतात आशा लोकांची मानसिकता सुधारू शकत नाही. मग त्यांनी शिजवलेलं अन्न देखील खाऊ नये.
शीघ्रकोपी लोकांकडे जेवणं टाळा. त्यांना कोणत्या गोष्टीचा राग कधी येईल सांगता येत नाही. रागाच्या भरात ते तुम्हाला भरल्या ताटावरून उठवायला ही कमी करणार नाहीत. चार चौघात अपमानीत ही करू शकतात. म्हणून आशा लोकांबरोबर जेवण नको.

ज्यांना दुसऱ्यांबद्दल साहनभूती वाटत नाही दया वाटत नाही क्षमा नाही आशा लोकांच्या घरी सुद्धा अन्न ग्रहण करू नये. कारण याच विचारांचा प्रभाव त्यांच्या घरी बनत असलेल्या अन्नावर होतो. आणि तेच अन्न आपण ग्रहण केल्यामुळे आपली मानसिकता सुद्धा तशीच होते.

व्य-सनी लोकांबरोबर जेवणं तर कटाक्षाने टाळायला हवं. तुम्ही व्य-सनी नसलात तरी व्यसनी लोक तुम्हाला व्य-सन लावायला मागे पुढे पाहणार नाही. तस करणं त्या लोकांना आणखीनच गौरवाच वाटेल. म्हणून आशा लोकांबरोबर जेवण आणि मैत्री दोन्हीही टाळायला हवं. तर आशा लोकांबरोबर जेवणं करणे तुम्ही सुद्धा कटाक्षाने टाळायला हवं.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *