नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मंडळी, यश पैसा प्रसिद्धी कीर्ती या सगळ्याच गोष्टी मिळवायला भरपूर कष्ट लागतात आणि त्याचबरोबर एक ठराविक काळ सुद्धा लागतो एका रात्रीतून या सगळ्या गोष्टी निश्चितच मिळत नाहीत पण या सगळ्या गोष्टी एका रात्री तुम्ही गमावू मात्र शकता आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की या गोष्टी मिळवणं जेवढं कठीण असतं तेवढ्याच त्या टिकवणे अवघड असतं आज आपण बोलणार आहोत आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या अशा गोष्टीबद्दल ज्यामुळे कोणतीही व्यक्ती एका रात्रीत कंगाल होऊ शकते

आणि म्हणूनच या गोष्टीबाबत सावधगिरी बाळगणं अत्यंत गरजेच आहे कोणती आहे ती गोष्ट आणि नक्की काय सांगितले आचार्य चाणक्यांनी हे सगळं मी तुम्हाला सांगणारे आचार्य चाणक्य म्हणजे कोण हे तर तुम्हाला माहितीच आहे चाणक्य नीति हा मोठा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि त्यामध्ये माणसाने कसं वागायला हवं व्यवहारात कसं वागायला हवं याबद्दल सविस्तर सांगितलं आणि यश मिळवण्यासाठी अनेक लोक आजही त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा पालन करतात की काही लोकांना त्रास दिल्याने माता लक्ष्मी कृतीत होते तसं तर आपल्याकडून कुणालाही कधीही त्रास होणार नाही

असाच माणसाचं वर्तन असावं पण त्यातही तुमच्याकडून चुकून मागून जरी या तीन लोकांना त्रास झाला किंवा या तीन लोकांची तुम्ही छळवणूक केली तर मात्र दुर्भाग्य तुमची पाठ कधीही सोडणार नाही आणि त्या तीन लोकांमध्ये सगळ्यात पहिली व्यक्ती येते ती म्हणजे महिलावर्गआचार्य म्हणतात की स्वतःला सामर्थ्यवान समजत तुम्ही जर स्त्रीवर अत्याचार केले तर ते तुम्हाला महागात पडू शकतील अशी चूक कधीही करू नका असं केल्याने तुम्ही आयुष्यभरासाठी दुर्भाग्य ओढवून घ्याल महिलांचा अपमान करणं त्यांना त्रास देणं हे माता लक्ष्मीला नाराज करण्यासारखा असतं त्याच बरोबर महिलांचा ज्या जागेवर आदर होत नाही त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही वास करत नाही जरी तुमची परिस्थिती खूप छान दिसत असली आणि त्या अहंकारात तुम्ही महिलांवर अत्याचार केलेत घरातल्या स्त्रीची छळवणूक केली

तर तुमचे वाईट दिवस यायला वेळ लागणार नाही तुमचं कर्म फिरून तुमच्यापुढे येऊन उभे राहणार हे नक्की त्याच बरोबर लहान मुलांना सुद्धा चुकूनही त्रास देऊ नये लहान मुलांना देवा घरची फुलं मानलं जातं देवाचं रूप मानलं जातं आणि म्हणून लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना भयंकर परिणामांना सामोरे जावे लागत त्यांचा छळ करणं त्यांच्या भविष्यावर परिणाम होईल इतका वाईट त्यांच्याशी वागणं हे अतिशय घृणास्पद कृती आहे

आणि या कृत्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर भयंकर होऊ शकतो तुम्हाला आयुष्यभर या कर्माचं फळ भोगत राहावं लागू शकतो म्हणूनच निष्पाप मुलांची कधीही गैरवर्तन करू नका त्याचबरोबर गरीब आणि असह्य व्यक्तींना सुद्धा त्रास देऊ नका असं केल्याने तुमच्यावर संकटाचा डोंगर कोसळू शकतो हे नक्की पैसा आणि सत्तेच्या नशेमध्ये धुंद झालेली व्यक्ती ही अनेकदा गरीब आणि असाह्य लोकांवर नको तेवढे अत्याचार करते कळत नकळत सुद्धा त्यांच्यावर अन्याय करते

आणि अशावेळी ही गोष्ट त्यांच्या वाईट कर्मांमध्ये अधिकच भर घालते आणि ज्याचे परिणाम त्यांना येणाऱ्या भविष्यात बघायला मिळतात मित्रांनो अशी उदाहरणं तुम्ही तुमच्या आजूबाजूला सुद्धा पाहिली असतील की एकेकाळी परिस्थिती खूप चांगली होती पण अचानक काय झालं माहित नाही आणि त्यांचे दिवस फिरले मग आपण म्हणतो साडेसाती आली किंवा कुंडलीतील ग्रह फिरले पण हे ना कुंडलीतले ग्रह असतात ना साडेसाती हे त्या माणसांच कर्म असतं जे त्यांच्यापुढे येऊन उभा राहत.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *