नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या Marathi Duniya पेजवर… हिंदू नववर्ष सुरु होण्यासाठी अवघ्या दिवसांचा अवधी शिल्लक आहे. गुढीपाडव्यापासून नववर्षाला सुरुवात होते. या दिवसापासून चैत्र नवरात्रोत्सव सुरु होतो. यावेळी ग्रहांची देखील साथ मिळणार आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा 22 मार्चला आहे. या दिवसापासून हिंदु नववर्ष आणि चैत्र नवरात्रीची सुरुवात होते. विशेष म्हणजे या दिवशी पाच ग्रहांची युती असणार आहे. मीन राशीत ग्रहांचा मेळा पाहायला मिळणार आहे. ग्रहांचा राजा सूर्य, चंद्र, गुरु, बुध आणि नेपच्युन हे ग्रह एकत्रितपणे मीन राशीत संचार करणार आहेत. तसेच या ग्रहांची नजर कन्या राशीवर असणार आहे. दुसरीकडे या ग्रहांच्या युतीमुळे बुधादित्य, गजकेसरी, हंस योग तयार होणार आहे.

सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे बुधादित्य योग, गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेसरी योग तयार होत आहे. तर गुरुच्या स्थितीमुळे हंस योग तयार होत आहे. गुरु ग्रह उच्चस्थानी असतो किंवा मूळ त्रिकोणात स्थित असतो, स्वतःच्या घरात किंवा मध्यभागी असतो, तेव्हा हा योग तयार होतो. कुंडलीत गुरू कर्क, धनु किंवा मीन राशीत पहिल्या, चौथ्या, सातव्या किंवा दहाव्या भावात स्थित असेल तर अशा कुंडलीत हंस योग तयार होतो. या पाच राशींवर असेल पाच ग्रहांची कृपा…

मिथुन रास – मीन राशीतील ग्रहांची महायुती या राशीच्या जातकांना फलदायी ठरेल. करिअरच्या दृष्टीकोनातून ग्रहांची स्थिती उत्तम राहील. नोकरीची नवी संधी मिळू शकते. देवी दुर्गेच्या आशीर्वादामुळे व्यवसायात भरभराट दिसून येईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. अचानकपणे धनलाभ होण्याची शक्यत आहे.

कर्क रास – या राशीच्या जातकांना नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात या काळात वाढ होईल. भावाबहिणींचं पूर्ण सहकार्य या काळात मिळेल. देवी दुर्गेच्या उपासनेमुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. या राशीच्या जातकांना ग्रहांच्या स्थितीमुळे भाग्याची पूर्ण साथ मिळेल.

कन्या रास – या राशीच्या जातकांच्या पंचग्रह महायुतीमुळे स्थावर मालमत्ता खरेदीचा योग आहे. तसेच करिअर आणि व्यवसायात ग्रहांमुळे यश दिसून येईल. कामाच्या ठिकाणी कामाचं कौतुक होईल आणि त्या बदल्यात चांगला मोबदला देखील मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. व्यावसायिक दृष्टीकोनातू राजयोग शुभदायी ठरेल.

वृश्चिक रास – या राशीच्या जातकांना गेल्या काही दिवसांपासून अडचणीचा सामना करावा लागला होता. आता ग्रहांच्या युतीमुळे अडकलेली कामं मार्गी लागतील. पण असं असलं तरी विचारपूर्वक निर्णय घ्या. वैवाहिक जीवनात आनंदाचा योग जुळून येईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि गुंतवणुकीसाठी उत्तम काळ राहील. खर्चावर नियंत्रण मिळवा.

मीन रास – या राशीत पाच ग्रह एकत्र येणार आहेत. त्यामुळे या राशीच्या जातकांना सर्वाधिक लाभ होईल. नोकरीच्या नवी संधी चालून येतील. पैशांची बचत होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. तीन योगांमुळे विशेष फायदा होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक Marathi Duniya पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेयर करा.

धन्यवाद.!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *