नमस्कार मित्रांनो.. “Marathi Duniya” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! मित्रांनो, आपला आहार आपल्या जीवनात खूप महत्वाचा असतो. आपल्या आहार चांगला असेल तर आपले शरीर व्यवस्थित राहते. मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी भोजनसाबंधी काही विशेष नियम सांगितले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात.

अजिर्णे भोजनम् विषम् – आधी घेतलेले भोजन पचले नसेल तर त्यानंतर घेतलेले भोजन विषासमान असते. कडकडीत भूक लागल्याशिवाय जेऊ नये. पूर्ण भोजन पचल्याशिवाय पुन्हा भजन करू नये. अन्यथा ते भोजन विषा समान असते. र्धरोगहारी निद्रा -योग्य निद्रा अर्धे रोग घालवते. मूढ़गढ़ाल्ली गढ़व्याली – सर्व डाळींमध्ये हिरवे मुग सर्वोत्तम आहेत. रोगप्रतिबंधक शक्ती यामुळे खूप वाढते. इतर डाळींमध्ये एक किंवा जास्त दोष असतात.

बागनास्थी संधानकारो रसोनहा – लसूण खाण्यामुळे हाडे जोडली जातात. अति सर्वत्र वर्जयेत – कशाचेही अति प्रमाणात खाणे टाळावे. नास्थिमूलम अनौषधाम – औषधी गुण नसलेली भाजी अस्तित्वात नाही. सर्व भाज्यांमध्ये औषधी गुण आहेत.

नां वैध्यः प्रभुरायुशाह – वैद्य आपले आयुष्य वाढवू शकत नाही. वैद्यांच्या मर्यादा आहेत. चिंता व्याधि प्रकाश्य – चिंता आरोग्याची वैरी असते. व्यायामच्छ शनैही शनैही – व्यायाम करताना जोरात करु नये, ह्रदयाची धडधड फार वाढू नये. आयुष्य कमी करते.

अजावथ चर्वनाम कुर्यात – अन्न चावून खाताना शेळी सारखे खावे. खुप वेळ चावावे कारण भरपूर लाळ पचवायला मदत करते. स्नानम नामा मानहप्रसाधनकरम धुस्वप्न विध्वसनम – आंघोळ केल्यावर नैराश्य निघून जाते. मानसिक आणि शारीरिक मरगळ निघून जाते.

ना स्नानम आचारेठ भुक्थवा – भोजन केल्यावर कधीच स्नान करु नये. पचनक्रियेवर विपरीत परिणाम होतो. नास्थि मेघासमाम थोयम पावसाच्या पाण्याची शुद्धता इतर कोणत्याही पाण्याला नसते. अजीर्णे भेषजम वारी अपचन झाल्यावर फक्त पाणी भरपूर पिल्याने चांगला फरक पडतो.

सर्वत्र नूथनाम सस्थाम सेवकाने पुर्रथनम – ताजे तेच घ्यावे आणि खावे. जुना भात, जुने नोकर नेहमी बदलावेत. नोकराला कामावरून काढू नये. त्यांची कामे बदलावी. नित्यम् सर्वा रास्सभ्याश एका भोजनात गोड, तिखट, कडू, आंबट आणि तुरट वस्तू असाव्यात. जटाराम पूरायेधरधाम अन्नाहि पोटात अर्धे अन्न घन असावे, पाव अन्न द्रव असावे आणि उरलेले पाव रिकामे असावे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *