नमस्कार मित्रांनो एक दहा-बारा वर्षाचा मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत त्यांच्या आजी-आजोबांकडे गावी नियमित जात असे. थोड्या दिवसांचा मुलगा मोठा झाला व त्यांच्या बाबांना तो म्हणू लागला. बाबा मी आता मोठा झालो आहे. आता मी आजी आजोबांच्या कडे स्वतः एकट्याने जाणार.

बाबांना त्याला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण तो पठ्ठ्या काही ऐकायला तयार नव्हता. खूप प्रयत्न करून देखील त्याने त्याचेच खरे केले, व त्याने गावी जाण्याचे ठरले त्याला सर्व काही सूचना देऊन स्टेशन वर त्यांचे वडील त्या मुलाला सोडायला येतात.

मुलगा किती जरी मोठा झाला तरी त्यांच्या आईवडिलांसाठी तो लहानच असतो. आई-वडिलांची काळजी जोपर्यंत आपण आई-वडील होत नाही, तोपर्यंत ती आपल्याला समजू शकत नाही.म्हणूनच म्हणतात आई वडिलांची जागा ज्यावेळी आपण घेऊ त्याचवेळी त्यांचे दुःख काय आहे ते आपण समजून घेऊ शकतो.

स्टेशनवर गाडी आली व तो मुलगा आजोबांच्या गावी जाण्यास त्या गाडीमध्ये बसला. गाडीमध्ये बसल्यानंतर बाबाने त्याला आणि चार समजुतीचे वाक्य सांगितले व जपून राहा.पहिल्यांदाच गावाला एकटा चालला आहेस. पोहोचल्या नंतर फोन कर अशा सर्व सूचना देऊन झाल्या.

एवढ्यातच गाडी सुटणार त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या खिशातून एक चिठ्ठी काढली. व त्या मुलाच्या खिशात ती चिठ्ठी ठेवली आणि त्यांनी त्या मुलाला सांगितले की ज्या वेळी तुला भीती वाटते, एकटे वाटतं त्यावेळीच ही चिठ्ठी तू वाच म्हणजे तुला आधार मिळेल.

तेवढ्यात ती गाडी स्टेशन वरून सुटली व हळूहळू करत गाडी वेग धरू लागल्यावरच लगेच, तो खिडकीतून डोकावून निसर्गाची किमया पाहू लागला ते भराभरा पळणारी झाडे, घरे, रस्ता, क्षणाक्षणाला सर्व समोरची चित्र बदलून जात होते या सगळ्याची मजा घेत होता. या सर्व आनंदात तो भारावून गेला होता.

हळूहळू त्या गाडीमध्ये गर्दी वाढू लागली. अनोळखी चेहऱ्यांनी गाडी भरून गेली. कोणीतरी आपल्याकडे पाहत आहे. असा त्याला भास होत राहिला व तो घाबरून जाऊन रडवेला झाला.व त्याला आई वडिलांची खूप आठवण येऊ लागली. त्या क्षणाला त्याला असे वाटू लागले की माझे आई-वडील देखील माझ्या सोबत असायला पाहिजे होते.

त्या क्षणात असताना बाबांनी आपल्या खिशामध्ये कसलीतरी चिठ्ठी दिली आहे. त्याची जाणीव झाली व तो भीतभीतच खिशातील चिठी पाहू लागला.व त्याने ती चिठ्ठी काढून त्या चिठ्ठी वाचण्यास सुरुवात केली. त्या चिठ्ठीवर असलेले होते त्या चिठ्ठीवर एकच ओळख लिहिलेली होती.

त्या चिठ्ठीवर बाळ तू घाबरू नकोस मी तुझ्या सोबतच पुढच्या डब्यामध्ये प्रवास करत आहे. तेव्हा केलेले पाहताच त्या मुलाचे डोळे पाण्याने दबून गेले होते.क्षणामध्ये सत्याची भीती पळून कुठल्या कुठे गेली होती. त्याला थोडा धीर आला होता, तो चिठ्ठी वाचून पूर्वीप्रमाणेच धाडसाने बसला होता.

मित्रांनो त्याच प्रमाणे श्री स्वामी समर्थांनी देखील आपल्या भक्तांना या जगामध्ये अशीच एक चिठ्ठी आपल्या भक्तांच्या खिशामध्ये घालून आपल्याला या भुतलावर पाठवले आहे.

ती म्हणजे स्वामींचे नामस्मरण व त्यांचा जय जय कार याचा सदैव नाम आपल्या मुखामध्ये राहिल्याने आपल्याला कसल्याही संकटांना सामोरे जावे लागणार नाही.वरील गोष्टी सांगितल्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज हेच आपले आई आणि वडील आहेत. ते आपल्याला सदैव आपली प्रत्येक पदोपदी रक्षण करत आहेत.

आणि करत राहणार आहेत त्यांच्यावर विश्वास ठेऊन आपण आपले जीवन जगत राहणे व त्यांच्या व दृढ विश्वास ठेवला पाहिजे. यामुळे आपल्याला देखील धीर असाच मिळत राहणार आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *