स्त्रिया खूप वेगळ्या असतात. त्या जेव्हा पत्नी किंवा बायको या भूमिकेत असतात तेव्हा त्यांचे नेमके समाधान कशात आहे हे फक्त आणि फक्त त्यांनाच माहीत असते. बायको ही सर्वसाधारण गृहिणी असेल तर ती खूपच अल्पसंतुष्ट असते. नवऱ्याच्या शर्टाचे तुटलेले बटन लावण्यातसुद्धा तिला अपार समाधान लाभते.

आपल्या छकुलीला शाळेत सोडून ती दिसेनाशी होईपर्यंत हात हलवत बाय करण्यातले तिच्या चेहऱ्यावरचे समाधान बघणे ही एक पर्वणी असते. मोठ्या मेहनतीने आणि मर्यादित साधनांपासून बनवलेली एखादी डिश जेव्हा घरचे सर्वजण खातात विशेषतः नवरा मिटक्या मारून खातो तेव्हा तिच्या चेहऱ्यावर येणारी समाधानाची तृप्ततेची लकेर असामान्य असते.

तांब्या-पितळेची भांडी लिंबाच्या सालीने किंवा चिंचेच्या कोळाने घासून लख्ख करते तेव्हा त्या भांड्यांच्या चकाकित तुम्ही तिचा तृप्त चेहरा बघू शकता.

आपल्या नवऱ्याच्या समाधानी आणि आशादायी नेत्रात जेव्हा ती स्वतःला पाहते तेव्हा सुद्धा ती खरोखर समाधानी असते. कुंडीतल्या झाडांना ती पाणी घालते तेव्हा मातीत जिरणारं पाणी आणि तिचं मन समाधानाने संपृक्त होत असतं.

गॅसवरील फ्लेम वर पोळी शेकतांना जेव्हा वाफेने टम्म फुगलेली पोळी ताटात टाकते तेव्हा तिचे समाधान पोळीच्या दोन्ही पदरातून वाफेच्या वलयासोबत चार भिंतीच्या आसमंतात पसरते.

मेथी निवडता निवडता आवडती सिरीयल बघतांना दारावरची घंटी वाजल्यावर ती दार उघडते, कधी लेकरं, कधी नवरा, कधी आई कधी बाबा यांना पाहून ती समाधानानं हरखून जाते.बायकोचं समाधान कशात असते हे फक्त तिलाच माहीत असते. बायको खरंच खूप वेगळी असते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *