नमस्कार मित्रांनो..Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात. असहाय्य, तेजहीन, दुर्बल झालेल्या समाजाला त्यांनी ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’, हा दिलासा दिला. खुद्द स्वामी आपली पाठराखण करत आहेत, हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो. स्वामी प्रत्यक्ष रूपाने सोबत नसले, तरी स्वामी कृपेने त्यांचे सान्निध्य भाविकांना पदोपदी जाणवते.

अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे. केवळ ‘श्री स्वामी समर्थ’ असा नामोच्चार केला, तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते, असा अनेकांचा अनुभव आहे. स्वामीकृपा मिळून गुरुबळ वाढावे, अधिक मासात स्वामींची साधना पुण्य-फलदायी व्हावी, यासाठी स्वामींचा एक मंत्र आवर्जुन म्हणावा, असे म्हटले जाते.

स्वामी समर्थांचा प्रभावी मंत्राचे बळ
सुखानंतर दुःख आणि दुखःनंतर सुख हे जीवनचक्र आयुष्यभर सुरूच असते. त्यापासून कुणाचीही सुटका झालेली नाही. मनुष्य जन्म म्हटला की सगळे भोग हे आलेच. अगदी देवाचीही त्यापासून सुटका झालेली नाही. माणसाला संघर्ष चुकलेला नाही. मात्र, त्यातून बाहेर येण्यासाठी समस्यांचे निवारण करण्यासाठी माणूस सतत कार्यरत असतो.

समस्या, अडचणीत स्वामी समर्थांचा मंत्र प्रभावी ठरू शकतो. समस्या दूर झाल्या नाहीत, तरी त्याच्याशी लढण्याचे बळ, शक्ती मिळू शकते, असे सांगितले जाते. ताणतणाव, नैराश्य यात अडकलेल्या प्रत्येक जीवाला हा स्वामी मंत्र तणाव नियंत्रणाचे धडे देतो. या मंत्रातले साधे शब्द प्रचंड दिलासादायक आहेत. उठल्यावर सकाळी आणि रात्री झोपताना हा मंत्र म्हणण्याचा आणि समजून घेण्याचा सराव केला, तर आयुष्यातून ताणतणाव कोसो दूर पळून जाईल, अशी अनेकांची श्रद्धा आहे.

स्वामी समर्थांचा अत्यंत प्रभावी तारक मंत्र
निःशंक हो, निर्भय हो, मना रे
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे
अतर्क्य अवधूत हे स्मर्तू गामी
अशक्यही शक्य करतील स्वामी ।।१।।

जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेविणा काळ ना नेई त्याला
परलोकही ना भिती तयाला ।।२।।

उगाची भितोसी भय पळू दे
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा
नको घाबरु तू असे बाळ त्यांचा ।।३।।

खरा होई जागा तू श्रद्धेसहित
कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त
कितीदा दिला बोल त्यांनीच हात
नको डगमगू स्वामी देतील साथ ।।४।।

विभूती नमन नाम ध्यानादी तिर्थ
स्वमीच या पंच प्राणाभृतात
हे तिर्थ घे, आठवी रे प्रचिती
न सोडेल स्वामी ज्या घेई हाती ।।५।।

।।श्री स्वामी समर्थ।।

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *