नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो, आज आपण पाहणार आहोत की कोणत्या दिवशी आपण देवीला ओठी भरणे शुभ मानले जाते, तुम्हाला हे माहीत असेल की, प्रत्येकजण नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवतेची पूजा करतात. तिची ओटी भरतात. त्याचबरोबर लक्ष्मीमातेची ही पूजा करतात,ओटी भरतात. नवरात्रीचे नऊ दिवस हे देवीचे दिवस मानले जातात.असे म्हटले जाते की, यावेळी या दिवशी या नऊ दिवसांच्या कालावधीत देविमाता ही आपल्या पृथ्वीवर अस्तित्वात असते.ती आपल्या सोबत वावरत असते.

तसेच त्याचबरोबर असेही म्हटले जाते की, या नऊ दिवसांमध्ये आपला कुलदेवतेची किंवा माता लक्ष्मी, माता सरस्वती ची किंवा कोणत्याही देवीची त्यांच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरात कोणत्या देवीची मूर्ती असेल तर तिची ओटी भरावी.

हे खूप शुभ मानले जाते. म्हणूनच या कालावधीत अनेक जण देवीची ओटी भरत असतात. ओटी भरण्याची ही एक सोपी पद्धत आहे. ओटी मध्ये तुम्ही नारळ, साडी, तांदूळ हे देऊ शकतात किंवा साडे ऐवजी ब्लाउज पिस ही करू शकता.आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ही ओटी नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी भरावी? कोणत्या दिवशी ओटी भरल्याने तीवनी देवी ला मान्य होते? कोणता दिवस ओटी भरण्यासाठी शुभ असतो?

प्रथम दिवस म्हणजेच घटस्थापनेचा दिवस, नंतर पंचमीचा दिवस, नंतर अष्टमीचा दिवस आणि नवमीचा दिवस हे दिवस खूप शुभ मानले जातात. या दिवशी खास करून सर्वजण देवीची ओटी भरत असतात. अशाप्रकारे नवरात्रीमध्ये हे चार दिवस शुभ मानले जातात. आणि जास्त करून लोक त्याच दिवशी देवीची ओटी भरतात. नवमी, पंचमी, अष्टमी आणि घटस्थापनेचा दिवस हा खूपच शुभ मानला जातो. आणि या दिवशी देवी ची भरलेली होती ही देवी ला मान्य होते.

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये असे अनेक प्रकारचे विधी नियम हे पुरातन काळापासून चालत आले आहेत त्याबदाल आम्ही तुम्हाला योग्य ती माहिती देत आहोत याबद्दल तुमचे काय मत आहे हे नक्की आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि आम्ही तुम्हाला अशीच भरपूर सारी माहिती देत राहू.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *