शनिवार, 9 डिसेंबर रोजी सर्वार्थ सिद्धी योगाचा शुभ प्रभाव दिवसभर सर्व राशींवर राहील. याशिवाय शनी आणि शुक्राचा नवम पंचम योग तुळ आणि कर्क राशीसह 5 राशींना यश मिळवून देणार आहे. शनीच्या कृपेने या राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होईल आणि करिअरमध्ये यश मिळेल. चला तर पाहूया मेष ते मीन राशीपर्यंत सर्व राशींसाठी शनिवार कसा असणार आहे.
मेष राशीच्या कामात होणार बदल
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असून कामाच्या ठिकाणी काही बदल होऊ शकतात आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. यामुळे तुमच्या सहकाऱ्यांना तुमचा हेवा वाटेल. दिवसभरात तुम्ही थोडा वेळ काढा आणि इतरांना मदत करा याचा फायदा होईल
तुमच्या चांगल्या वागणुकीने लोकांची मने जिंकू शकाल. रात्री पत्नीची तब्येत अचानक खराब होईल त्यामुळे कदाचीत तुम्हाला धावपळ करावी लागू शकते.

वृषभ राशीला होणार आर्थिक लाभ
वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल आणि आजचा दिवस कुटुंब आणि मित्रांसमवेत आनंदात जाईल. दुपारपर्यंत तुम्हाला काही चांगली माहिती मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्या आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. संध्याकाळी तुमच्या घरी पाहुणा येतील त्यामुळे काम आणि खर्च या दोन्ही गोष्टींमध्ये वाढ होणार आहे. काही प्रमाणात तुमचा मूड खराब होऊ शकतो.

मिथुन राशीसाठी रखडलेली कामे पूर्ण होणार
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम राहील. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपेने कोणतीही रखडलेले काम पूर्ण होऊन तुम्हाल बक्षिस देखील मिळेल. तुम्ही आज दिवसभर व्यस्त असाल हे चांगले आहे पण तुमचे महत्वाचे कार्य करू शकणार नाही. फालतू खर्च टाळा. गाडी चालवताना कोणतेही नियम मोडू नका. अन्यथा दंड भराला लागेल त्यात तुमचे
जास्तीचे पैसे खर्च होतील शिवाय मनस्ताप देखील होईल.

कर्क राशीने गडबडीत निर्णय घेवू नये
कर्क राशीच्या लोकांचा चांगलाच आर्थिक फायदो होणार असून अचानक धनलाभ होणार आहे. त्यामुळे बचत करु शकाल. व्यावसायिक योजनांना गती मिळेल आणि तुमची प्रतिष्ठा वाढेल. घाईगडबडीत आणि भावनेने घेतलेले निर्णय तुमचे नुकसान करू शकतात, तेव्हा सावध राहा. संध्याकाळी कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखता येईल.

सिंह राशील प्रत्येक कामात यश
सिंह राशीच्या लोकांचा आज फायदा होणार असून तुम्हाला अपेक्षेप्रमाणे प्रत्येक कार्यात यश मिळेल. तुम्ही प्रत्येक बाबतीत विरोधकांच्या पुढे असाल. रखडलेली कोणतीही महत्त्वाची कामे पूर्ण होतील. तब्येतीची काळजी घ्या कारण पचनक्रिया मंदावत असून डोळ्यांचा त्रास सुरु होण्याची शक्यता आहे. संध्याकाळ पासून रात्रीपर्यंतचा वेळ प्रियजनांना सोबत अगदी आनंदात व्यतीत होईल. खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्या.

कन्या राशीचा मान-सन्मान वाढणार
कन्या राशीचे लोक आज मोठ्या मेहनतीने आपली कामे पूर्ण करतील आणि तुमच्या योजना यशस्वी होतील. आज तुमची संपत्ती, मान-सन्मान वाढेल आणि तुमचे मन सर्जनशील कार्य पूर्ण करण्यात गुंतलेले असेल. कुटुंबात एखादे शुभ कार्य असेल तर ते व्यवस्थीत आणि आनंदात पार पडेल. तुमच्या मनासारखे काम मिळाले नाही म्हणून चिडचिड करु नका, तुमच्या रागावार नियंत्रण ठेवा. घरासाठी कोणतीही आवश्यक खरेदी करू शकता. तुमच्या कामात सरकारी मदत मिळेल. सूर्यास्तानंतर अचानक फायदा होऊ शकतो.

तुळ राशीसाठी उत्पन्नाचे मार्ग खुले होतील
तुळ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.
तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे उत्पन्नाचे नवीन स्त्रोत वाढतील आणि पैशाशी संबंधित योजना यशस्वी होतील. आज तुम्हाला विशेष सन्मान मिळेल त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमच्यासाठी जास्त धावपळीचा दिवस आहे पण तुम्ही काळजी घ्या. जोडीदाराकडून पुरेसा पाठिंबा आणि सहवास मिळेल. प्रवास आनंदात आणि मजेत होईल. .

वृश्चिक राशीने बोलण्यावर नियंत्रण ठेवावे
वृश्चिक राशीच्या लोकांचा दिवस चांगला आहे आणि आज तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. धन, मान-सन्मान आणि कीर्ती वाढेल. रखडलेली कामे मार्गी लागतील आणि आज तुमच्या आवडत्या व्यक्तींना भेटून मन प्रसन्न राहील. बोलण्यावर नियंत्रण न ठेवल्याने प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते आणि जी गोष्ट होणार आहे ती कदाचीत बिघडू देखील शकते. रात्री कुटुंबासोबत मस्त वेळ घालवणार आहात.

धनु राशीच्या प्रत्येक योजना पूर्ण होणार
धनु राशीसाठी चांगली बातमी असून तुमच्या प्रत्येक योजना यशस्वी होतील आणि तुमची संपत्ती मान-सन्मान वाढेल. सांसारिक सुखाची साधने वाढतील तसेच ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची मदत मिळेल त्यामुळे कामे पटापट पूर्ण होतील. व्यापाऱ्यांनी पैशांचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. कोर्टकचेरीत आज तुमच्या फेऱ्या वाढणार आहेत त्यामुळे थोडासा ताण जाणवेल.

मकर राशीच्या खर्चात अचानक वाढ
मकर राशीच्या लोकांचा दिवस शुभ असून तुमची अनेक कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. व्यवसायात बदलाचे नियोजन करता येईल आणि त्याचा फायदा होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल त्यामुळे त्यांचा मान-सन्मान वाढेल. धार्मिक ठिकाणी जाण्याचे आयोजन तुम्ही करु शकता. कार चालवताना कोणताही नियम मोडू नका. आज सावधगिरी बाळगा. कदाचीत अचानक गाडी बिघडल्याने तुमचा खर्च वाढू शकतो.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *