ज्योतिष शास्त्रानुसार, चंद्र, सूर्य, ग्रह, तारे हे आपापली दिशा व स्थान बदलत असतात त्यामुळे शुभ, अशुभ योग निर्माण होत असतात. याचा मनुष्य जीवनावर खूप परिणाम पडत असतो. हे काही राशींसाठी शुभ ठरते तर काही राशींसाठी अशुभ. शनिने जानेवारी २०२३ मध्ये कुंभ राशीत प्रवेश केला होता आणि २०२५ पर्यंत या राशीत राहील. यामुळे 2025 पर्यंत कुंभ राशीतील लोकांच्या संपत्तीत प्रचंड वाढ होईल. चला तर मग पाहूया कुंभ राशीतील लोकांसाठी ही दोन वर्षे कशी राहणार आहेत?

कुंभ राशीतील शन
ज्योतिष शास्त्रानुसार सर्व ग्रहांना आपापले विशिष्ट महत्त्व प्राप्त आहे. या नवग्रहांवरच ब्रह्मांड टिकले आहे असे म्हटले जाते. या सर्व ग्रहांमध्ये शनिदेव हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी शनीला एकूण अडीच वर्षे लागतात. या वर्षी जानेवारीत शनीने कुंभ राशीत प्रवेश केला होता आणि 2025 पर्यंत तो या राशीत राहील. शनीला न्याय देवता आणि कर्माचा दाता म्हणून ओळखले जाते.

पण त्याचबरोबर शनी राशीत असण्याच्या दोन स्थिती असतात एक शुभ शनी आणि एक दुसरा शनी ज्याला आपण साडेसाती म्हणून सुद्धा ओळखतो. मग जो शुभ शनी आहे तो एखाद्या गरीबला पण श्रीमंत बनवू शकतो व साडेसाती वाला शनी एखाद्या राजाला सुद्धा भिकारी बनवू शकतो. शनीच्या या कुंभ राशीतील अडीच वर्षाच्या वास्तव्यामुळे कुंभ राशी बरोबरच आणखी दोन राशींवर याचा परिणाम होणार आहे चला तर बघूया कोणत्या आहेत या तीन राशी?

कुंभ
2023 ते 2025 हा काळ कुंभ राशीतील लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे कारण की यावेळी स्वतः शनीदेव कुंभ राशीत विराजमान आहेत. शनिदेव कुंभ राशीच्या 12 व्या घरात स्थानबद्ध असल्यामुळे व तसेच येणाऱ्या दिवाळीमध्ये या राशीत शश राजयोग सुद्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे कुंभ राशीचे लोकांना आर्थिक धन लाभ होण्याची शक्यता आहे.

तसेच तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुद्धा खूप फरक पडणार आहे. तुम्हाला घरात व समाजात एक विशिष्ट स्थान प्राप्त होईल. जर तुमचे एखादे जुने काम कोर्टात अडकले असेल तर नक्कीच त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. तुम्हाला वैवाहिक जीवनात आनंद भेटेल व जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला मानसिक शांती सह आर्थिक धन लाभ ही इच्छित आहे.

तूळ
शनिदेव कुंभ राशीत विराजमान झाल्यामुळे त्याचा परिणाम तुळ राशीतील लोकांवरही होणार आहे. हा बदल तूळ राशीतील लोकांसाठी जवळपास शुभच मानला जात आहे. तूळ राशीच्या पाचव्या घरात शनिदेव भ्रमण करणार असल्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या मुलांना नोकरी मिळू शकते अथवा त्यांची लग्ने ठरु शकतात. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमचे नक्कीच कुठेतरी प्रेम संबंध जोडू शकतात.

जर तुम्ही शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंड किंवा आणखी कुठे काही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला अनपेक्षित मोठा धनलाभ होऊ शकतो. जर तुम्ही वाहन घेण्याचा प्रयत्न करत असाल तर ती तुमची इच्छा आता लवकरच पूर्ण होऊ शकते व तुम्हाला वाहन सुख प्राप्त होऊ शकते.

मिथुन
शनि देवाचे कुंभ राशीतील स्थानबद्ध होणे मिथुन राशीच्या लोकांसाठी सुद्धा एक वरदानच ठरणार आहे. मिथुन राशीच्या नवव्या घरात शनिचे भ्रमण होणार आहे. यावेळी तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी खूप फायदा होणार आहे तुम्हाला प्रमोशन अथवा बोनस मिळू शकतो. तुम्हाला नोकरीमध्ये नवीन आव्हाने भेटली जाणार आहेत

आणि तुम्ही ते यशस्वीरित्या पार पाडणार आहात. सध्या नशीब तुमच्या बरोबर असल्यामुळे तुम्ही ज्या कामात हात घालाल ते काम यशस्वीरित्या पार पाडाल. जर तुम्ही खूप दिवसापासून बाहेरच्या देशात जाण्यासाठी प्रयत्न करत असाल तर परदेशात जाण्याची तुमची इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते. मुलांसाठी शैक्षणिक बाबतीत चांगली गोष्ट समजेल.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *