आज मार्गशीर्ष शुक्ल दशमी, मोक्षदा स्मार्त एकादशी, गीता जयंती, मौनी एकादशी, मकरायन असे सगळे योग जुळून आलेले आहेत. त्याचा परिणाम तुमच्यावर कसा पडणार आहे. तुमची आजची कामे होणार का? व्यवसायात नफा मिळणार का? परदेशात जाण्याचा योग आहे का? परिक्षेत यश मिळेल का? नोकरीत बढती होणार का? असे अनेक प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर आले असतील, चला तर मग जाणून घेवूया, मेष ते मीन राशीपर्यंत आजचे राशीभविष्य ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून.
मेष राशीसाठी मित्रांसोबत पार्टीचा योग

आजचा दिवस तुमच्यासाठी ठिक ठिक परिणाम घेवून येणार आहे. विवाहयोग्य व्यक्तींसाठी आज चांगल्या संधी मिळतील.संध्याकाळी जवळच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्रांसोबत
गप्पागोष्टी होतील किंवा पार्टीचा योग सुद्धा जुळून येईल. तुम्हाला काही महत्त्वाची माहितीही मिळेल.कुटुंबातील एखाद्या सदस्याबरोबर असणाऱ्या तुमच्या तक्रारी किंवा नाराजी दूर होवून तुम्ही एकमेकांसोबत मित्रासारखे वागणार आहात.जर तुम्ही आज प्रॉपर्टी डील करत असाल तर तो सौदा तुम्हाला तोट्यात टाकणार आहे त्यामुळे थोडावेळ थांबा. आज नशीब ८९ % तुमच्या बाजूने असेल. मुंग्यांना पीठाचे गोळे खायला द्या.

वृषभ राशीने रागावर संयम ठेवावा
तुमच्या स्वभावात काही चांगले बदल होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आश्चर्य वाटेल, परंतु आज तुम्ही तुमच्या रागीट स्वभावाला ऑफिसमध्ये जरा आवर घाला तसेच तुमच्या बोलण्यात कायम गोडवा ठेवा.ज्यामुळे तुमचे सहकारीही आनंदी होतील. तुम्हाला काही मानसिक समस्या असेल तर आज त्यावर उपाय शोधू शकाल. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या दिनचर्येत बदल करावे लागतील.
आज नशीब ८३ % तुमच्या बाजूने असेल. सूर्य नारायणाला सकाळी अर्घ्य द्या.

मिथुन राशीने खर्च करताना विचार करावा
आजचा दिवस आध्यात्मिक कार्यात व्यतीत होणार आहे.आज तुम्ही तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राला महागडे गिफ्ट देण्याचा विचार करत आहात, ही गोष्ट चांगली आहे पण तुमच्या खिशाची काळजी देखील तुम्हाला घ्यावी लागेल. अन्यथा भविष्यात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. लव लाइफ चांगले राहणार आहे. जे आज शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत त्यांना भविष्यात नक्कीच मोठा नफा मिळेल. संध्याकाळी मित्राच्या घरी जाण्याचा बेत आखू शकाल.
आज ७१ % नशीब तुमच्या बाजूने असेल. योग प्राणायाम करा.

कर्क राशीची सरकारी कामे होणार
आज इतरांवर तुमचा प्रभाव जरा जास्तच पडणार आहे. सरकारी क्षेत्रातून लाभ होताना दिसतोय. अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण झाल्याने तुमचा उत्साह वाढेल. आज तुम्ही जोडीदारासाठी सरप्राईज पार्टी प्लॅन करू शकता. तुम्ही भावंडांसोबत चांगला वेळ घालवाल. जे लोक घरापासून दूर काम करत आहेत त्यांना कुटुंबातील सदस्यांची खूप
आठवण येईल. आज नशीब ९५ % तुमच्या बाजूने असेल. गणपतीला लाडूचा नैवेद्या दाखवा.

सिंह राशीने निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा
जे प्रेमात गुंतलेले आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल, ज्यामुळे तुमचे प्रेम अधिक दृढ होईल. आज तुमच्या
करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी तुम्ही जोडीदारासोबत शेअर कराल, पण जर कोणी तुम्हाला सल्ला देत असेल तर त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी, आणखी एका तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणं चांगलं राहील.तुम्हाला व्यवसायाशी संबंधित काही कामानिमित्त घराबाहेर पडावे लागू शकते. आज नशीब ६५ % तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूच्या नावाने १०८ वेळा जप करा

कन्या राशीसाठी प्रवासाचा योग
आज तुमच्यामधील धार्मिक भावना अधिक वाढणार आहे. ज्यामुळे तुमच्या आजूबाजूचे लोक त्याचा फायदा घेताना दिसतील आणि तुम्हाला ज्ञान देऊ शकतील, अशावेळी तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करायला हवे, अन्यथा तुमचे मन जे काही म्हणेल ते तुम्हाला ऐकायला हवे. तुम्हाला व्यवसायासाठी प्रवास करावा लागू शकतो, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला जर वाटत असेल की मुलांनी एखाद्या परिक्षेचा फॉर्म भरावा तर आजचा दिवस त्याच्यासाठी चांगला असेल. आज ७२ % नशीब तुमच्या बाजूने असेल. भुकेल्या लोकांना जेवू घाला.

तुला राशीने आरोग्याची काळजी घ्यावी
तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, कारण आज दिवस तुम्ही खूप व्यस्त राहणार आहात तसेच आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे संध्याकाळी डोकेदुखी, ताप इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला कामासोबतच आरोग्याची ही काळजी घ्यावी लागेल. घरात किंवा व्यवसायात कोणतीही समस्या येत असेल तर तुम्ही धैर्याने त्याला सामोरे जा आणि त्यावर तोडगा काढा. तुमच्या कुटुंबातील कोणीतरी तुम्हाला चुकीचा सल्ला देऊ शकते,तेव्हा सावध राहा. आज ७८ % नशीब तुमच्या बाजूने असेल. पांढरे रेशमी कपडे दान करा.

​वृश्चिक राशीसाठी शुभलाभ देणारा दिवस
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही भागीदारीत केलेल्या व्यवसायात अपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही एखाद्या जुन्या मित्राबरोबर नवीन व्यवसाय करण्याचा विचार कराल, परंतु आपल्या भावाचा सल्ला घेऊनच पुढे जाणे चांगले ठरेल. कुटुंबात विवाहयोग्य सदस्य असेल तर त्याच्यासाठी चांगली संधी येऊ शकते. व्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्याने आनंद होईल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाही आज चांगल्या संधी मिळतील. आज नशीब ८२ % तुमच्या बाजूने असेल. दररोज संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करावे.

धनु राशीची पगारवाढ होणार
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदा देणारा आहे. तुम्ही तुमचा काही वेळ सासू-सासऱ्यांसोबत व्यतीत कराल. कुटुंबातील सदस्यांसमवेत एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याचा बेत आखु शकाल. लहान मुलांसोबत वेळ छान जाणार आहे. जोडीदारासोबतच्या नात्यात काही दुरावा आला असेल तर आज त्यातही सुधारणा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना आज एखादी चांगली बातमी म्हणजे पगारवाढ किंवा बढती होवू शकते त्यामुळे
तुम्ही खूप आनंदी असाल.आज नशीब ६३ % तुमच्या बाजूने असेल. सकाळी भगवान सूर्याला तांब्याच्या भांड्याने अर्घ्य द्यावे.

मकर राशीसाठी व्यवसायात करार होणार
विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. विद्यार्थी त्यांच्यामधील कमतरता शोधून त्या सुधार करण्याचा प्रयत्न करणार आहेत. जर तुम्ही एखाद्या विषयात कमकुवत असाल तर आज तुम्ही त्याचाच अभ्यास करताना दिसणार आहात. लवलाइफ जगणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल कारण जोडीदारासोबतच्या तक्रारी दूर होणार आहेत. मकर राशीच्या ज्या व्यक्ती व्यापार करत आहेत ते आज एखादा खास करार करणार आहेत. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थीती सुधारेल आणि तुम्हाला समाधान मिळेल. आज नशीब ९१ % तुमच्या बाजूने असेल. श्री गणेश चालीसा पठण करा.

कुंभ राशीचे नातेसंबध अधिक दृढ होतील
आजचा दिवस तुमच्यासाठी सुखद परिणाम घेवून येणारा आहे. लवलाइफ जगणाऱ्या लोकांना पार्टनरकडून फोनवर एखादी चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक जीवनातही जर नात्यात काही खटके आले असतील तर आज तुम्ही ते एकत्र होवून सोडवाल.प्रॉपर्टी डीलची चर्चा असेल तर आज तुम्ही ती खरेदी करू शकाल, पण त्यासाठी तुमच्या जोडीदाराचा सल्ला घ्या. आईची तब्येत बिघडली असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज नशीब ६४ % तुमच्या बाजूने असेल. गायींना गूळ खायला द्यावा.

मीन राशीने खर्चाकडे लक्ष द्यावे
आजचा दिवस जोडीदारासोबत व्यतीत कराल. जोडीदाराला बाहेर घेवून जावू शकता तसेच तिला एखादी भेटवस्तू घेवून देवू शकता. त्यामुळे आजचा दिवस अगदी आनंदात जाणार आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज एखाद्या मित्र किंवा शेजाऱ्याला भेटून तुम्हाला समाधान मिळेल तसेच तुमची मैत्री अधिक घट्ट होईल. जर तुम्ही आज शॉपिंगवर जास्त खर्च करत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो, त्यामुळे आज बजेट बनवून काम करावं लागेल. आज नशीब ७६ % तुमच्या बाजूने असेल. बजरंगबाणचे पठण करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *