नमस्कार मित्रांनो..Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! श्री स्वामी समर्थ. तर एकदा श्री स्वामी समर्थांची स्वारी देशमुखांचा वाडा इथे बसली होती. तेव्हा मोगलाई तील एक बाई आपल्या नंतर मुलाला घेऊन स्वामीच्या दर्शनासाठी आली.तिने स्वामींचे दर्शन घेऊन स्वामी विनंती केली की मौजी बंधन झाल्या पासून माझ्या मुलाची दृष्टी गेलेली आहे. तरी स्वामी कृपा करून माझ्या मुलाच्या दृष्टी द्यावी, असे उद्गार ऐकताच स्वामी महाराष्ट्राला म्हणाले. पाच रक्षसांची परीक्षा घेण्यासाठी येत आहे तेव्हा तुझा मुलगा डोळे उघडेल.

इतक्यात पगडी घातलेले 5 वैष्णव तेथे आले आणि स्वामी ची कीर्ती ऐकून हा संन्यासी कोठे ही जेवतो आणि कोठे ही झोपतो याचे हे ढोंग बाहेर काढलेच पाहिजे या उद्देशा ने त्याने स्वामी नमस्कार न करता मोठय़ा अभिमाना ने येऊन बसले. त्यातील काही मराठी तर काही कन्नड भाषेत आपापसात चर्चा करू लागले. तेव्हां स्वामीनि त्या अंध मुलास सांगितले. इकडे ये आणि त्या काळाच्या मनातील वाक्ये त्यांना उत्तरा सहीत सांग.

तो आंधळा मुलगा स्वामींना म्हणू लागला की स्वामी महाराज मला तर अक्षरे ओळखता देखील येत नाही तर मी त्यांना काय सांगणार? मग स्वामी समर्थांनी आपल्या गळ्यातील माळ त्यांच्या गळ्यात घातली आणि झेंडू चे फूल त्याचा डोळ्यास लावले. स्वामी चा हात त्याच्या डोळ्यास लागताच. त्यां मुलाने डोळे उघडले.आणि त्याच्या डोळ्यातून तेजाचे लोट वाहू लागले. आणि तो मुलगा वैष्णवाच्या समोर उभा राहिला. आणि त्या वैष्णवांच्या मनात असलेली वेदवाक्य भगवत् गीतेतील श्लोक त्यांच्या समाधान असे सांगू लागला.

स्वामिनी ही दिलेले पारमार्थिक सामर्थ्य पाहून ते वैष्णव चांगलेच घाबरले होते आणि आपला खोटा अभिमान सोडून अनन्यभावाने स्वामींच्या चरणीं लोळू लागले आणि क्षमा मागू लागले. महाराज अपराधा ची क्षमा असावी अशा पद्धतीने अश्विन ने स्वामी च्या पायांला त्यांनी अभिषेक घातला. मग स्वामींना त्यांची दया आली व स्वामी बोलले. गंगास्नान करून भागवत धर्माचे आचरण करा. असता तात्काळ अनुग्रह स्वामी ने त्यांच्या वर केला.

त्यानंतर ते वैष्णव तेथून निघून गेले. पण त्यानंतर ते न चुक ता अक्कलकोट ला येऊ लागले. तो अंधळा मुलगा सुद्धा स्वामींच्या कृपेने बरा झाला. त्याला दृष्टी प्राप्त झाली व पुढे तो खूप मोठा विद्वान झाला.एखाद्या सामान्य मुलास आपल्या कृपादृष्टी ने पारमार्थिक सामर्थ्य देणे ही अतिशय अद्भुत अशी गोष्ट आहे आणि हा अद्भुत असा चमत्कार श्री स्वामी समर्थ महाराज करू शकता.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *