आज सोमवार, मार्गशीर्ष शुक्ल
षष्ठी तसेच चंपाषष्ठी देखील आहे याचा नक्कीच लाभदायक परिणाम पहायला मिळेल. आजच्या दिवशी तुमच्या राशीत काय लिहीलं आहे. घर होणार का? परदेशात जावू शकणार का? गाडी घेवू शकतो का? नोकरी मिळणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असतील तर मग जाणून घेवूया, आजचे राशीभविष्य ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून.

मेष राशीसाठी खर्चिक दिवस
आजचा दिवस तुमच्यासाठी खर्चिक असेल. आज तुमचे घरगुती खर्च अचानक वाढू शकतात. ज्यामुळे तुम्ही चिंतित असाल. मात्र व्यवसायात झालेल्या नफ्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. खासगी नोकरी करतात आज चांगली ऑफर येऊ शकते. ज्यामुळे तुम्ही खुश असाल. तुम्हाला डोळ्यासंबंधी समस्या होऊ शकते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. लवलाइफ चांगली असून जोडीदाराला घेवून बाहेर फिरणे होणार आहे. आज नशिब ६९ टक्के तुमच्या बाजूने असेल आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या.

वृषभ राशीला कौटुंबिक सुख मिळेल
तुम्हाला कुटुंबात सुख समाधान मिळेल. तुम्ही दिवसातील काही वेळ भावंडांसोबत घालवाल. त्यांच्याबरोबर वैचारिक देवाण-घेवाण कराल ज्यामुळे मन मोकळे होईल. आज तुम्ही आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन काम करा, त्यामध्ये तुम्हाला लाभ मिळेल. व्यापारातही लाभ होईल.परदेशामधील कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी येईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी वरिष्ठांची मदत घ्यावी लागेल. आज ७९ टक्के नशिब तुमच्या बाजूने असेल. गाईला हिरवा चारा द्या.

मिथुन राशीवर वरिष्ठ अधिकारी खुष असणार
आजचा दिवस तुमच्या करिअरच्या दृष्टीने चांगला असले. तुमचे वरिष्ठ तुम्हाला असे एखादे काम देतील की ज्यामध्ये तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. परंतु तुमच्या मेहनतीमुळे संध्याकाळपर्यंत ते काम पुरे कराल. त्यामुळे वरिष्ठ खुश होतील. आज तुम्ही जर नवीन नोकरीत रुजू होणार असाल तर फायद्याचे आहे.आज कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे नाराजीचे वातावरण असेल. यासाठी तुमचा खर्चही होईल.आज नशिब ६२ टक्के तुमच्या बाजूने असेल. माता लक्ष्मीची पूजा करा.

कर्क राशी आध्यात्मिक कार्यात व्यस्त राहणार
आज तुमचा दिवस आध्यात्मिक कार्यात व्यतीत होईल. तुम्ही जास्त करुन गरजूंची सेवा अथवा दान-पुण्य कार्यामध्ये व्यस्त असाल. तुमच्या मनात उडालेली खळबळ
आज संपेल आणि तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. मुलांबद्दल शिक्षणासंबंधी सूचना
मिळतील.कुटुंबातील सदस्याच्या लग्नाच्या बाबतीत चाललेली चर्चा आज फायनल होईल. याचबरोबर कुटुंबात शुभ आणि मांगलिक कार्यक्रमावर चर्चा होईल. आज नशिब ९२ टक्के तुमच्या बाजूने आहे. पिंपळाच्या झाडाला पाणी आणि दूध एकत्र करुन अर्पण करावे.

सिंह राशीने तब्येत सांभाळावी
तुमचे आरोग्य आज काहीसे ठिक राहणार नाही, छोट्या तक्रारी समोर येणार आहेत. मसालेदार, तळलेले पदार्थ वर्ज्य करा नाही तर पोटाच्या संबंधीचे आजार तुमच काळजी वाढविणार आहेत. पहिल्यापासून काही समस्या असेल तर त्यासाठी डॉक्टरी सल्ला घेणे उत्तम. नाहीतर भविष्यात मोठा आजार बळावू शकतो. आज तुम्ही व्यापारात खुश असाल कारण अचानक रखडलेले पैसे मिळतील. यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. आज नशिब ८९ टक्के तुमच्या बाजूने आहे. माशांना पिठाच्या गोळ्या खाण्यास द्या.

कन्या राशीची आर्थिक स्थिती मजबूत होणार
आजचा दिवस तुमच्यासाठी ठिक ठिक आहे. जीवनसाथीबरोबर काही वेळ घालवाल. यामध्ये भविष्यातील योजनांवर चर्चा होईल. आज सायंकाळी कुटुंबाकडून तुम्हाला काहीतरी सरप्राइज मिळेल. पार्टनरशीपमध्ये व्यापार करणाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळेल. ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल, मात्र छोटे व्यापाऱ्यांनी आज कोणत्याही अमिषाला बळी पडू नये. व्यवहार करताना सावध रहा नाहीतर पश्चातापाची वेळ येईल. आज ९५ टक्के नशिब तुमच्या बाजूने आहे. गायत्री चालीसाचे पठण करा.

तूळ राशीची व्यवसायातील अडचण दूर होणार
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. जर तुमच्या व्यवसायासाठी व्यक्ती, बँक, संस्थेकडून कर्ज घ्यावयाचे असेल तर सहज मिळेल. ज्यामुळे तुमची व्यवसायात येणारी अडचण दूर होईल. तुम्ही आज भावाबरोबर विचारविनिमय केले तर व्यावसायिक समस्या दूर करण्यास मदत मिळेल. मुलांच्या लग्नास काही विघ्न येत असेल तर कुटुंबातील सदस्याच्या मदतीने ते दूर होईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे दरवाजे खुले होतील. आज सायंकाळी तुम्ही कुटुंबासोबत पिकनिकवर जाण्याचे नियोजन कराल. आज नशिब ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. बजरंगबली हनुमानाला सिंदूर भेट द्या.

वृश्चिक राशीसाठी फलदायी दिवस
आजचा दिवस तुमच्यासाठी निश्चित फलदायी असेल.लवलाइफमध्ये पार्टनर सोबत बोलताना वाणीवर मधुरता ठेवावी लागेल नाहीतर कोणत्याही गोष्टीमुळे वाद उत्पन्न होईल, जो कायद्याचे रूप घेऊ शकतो. तुमच्या आई कडून किंवा मामाकडून पैसे उधार घेऊ नयेत नाहीतर ते चुकते करताना कठीण होईल. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आजचा दिवस उत्कृष्ट असेल. त्यांना शिक्षकांकडून भविष्यकाळातील नियोजनसाठी
मार्गदर्शन मिळेल. ज्यावर तुम्ही अंमल कराल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना आज चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज ६५ टक्के नशिब तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूची आराधना करा.

धनु राशीसाठी लाभदायक दिवस
आजचा दिवस तुमच्या अत्यंत फलदायी असेल. तुमच्या आईच्या आरोग्यासंदर्भात काही समस्या असेल तर त्यात सुधारणा होईल. त्यामुळे तुम्ही खुश असाल. आजच जमीन,गाडी खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल. आज तुम्ही तुमच्याच समस्येमुळे थोडेसे चिंतित असाल. मनातील सकारात्मक विचार येतील ज्यामुळे कोणाला मदतीसाठी तुम्ही मागे हटणार नाही. कौटुंबिक जीवनात आज बदल होतील. जीवनसाथीचा सहयोग आणि सानिध्य मिळेल. आज नशिब ७४ टक्के तुमच्या बाजूने आहे. विष्णू सहस्त्र नामाचे पठण करतील.

मकर राशीने रखडलेली कामे पूर्ण करावीत
आज दिवसाची सुरुवात अगदी उत्साहात होणार आहे. त्यामुळे तुमची कामे पटापट होणार आहेत. तुमची रखडलेली कामे पूर्ण करा त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होणार आहे. आज तुम्ही हाती घेतलेले प्रत्येक काम तुम्ही पूर्ण कराल याकडे लक्ष द्या. कौटुंबिक सदस्याबरोबर काही भांडण झाले तर तुम्ही रागावर नियंत्रण ठेवा आणि फार बोलू नका. आज नशिब ६३ टक्के तुमच्या बाजूने असेल. पिंपळ वृक्षाच्या खाली दिवा लावा.

कुंभ राशीचा मान-सन्मान वाढणार
आजचा दिवस तुमचा मान सन्मान आणि संपत्तीमध्ये वाढ होणार आहे. प्रॉपर्टीचा करार फायनल करणार असाल तर त्याला सकारात्मक आणि नकारात्मक पैलूनी पडताळून पाहा. नाहीतर भविष्यात मोठे संकट तुमच्यावर येऊ शकते. तुमच्या कार्यक्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा तुमच्यावर वरदहस्त असेल ज्यामुळे बढतीसारखी चांगली बातमी कानी पडेल. तुमचे संयमी वागणे आणि गोड बोलणे तुम्हाला सन्मान देईल, त्यामुळे वाणी मधुर असूद्या. आज नशिब ८१ टक्के तुमच्या बाजूने असून गरजू लोकांना मदत करा.

मीन राशीसाठी आनंद देणारा दिवस
आज तुमचे व्यक्तीत्त्व उजळून निघेल. तुमच्या प्रसन्न व्यक्तीमत्वामुळे प्रत्येक जण तुमचा मित्र बनण्यासाठी उत्सुक असेल. परंतु व्यापारात आज नुकसान होण्याची
शक्यता आहे.भविष्य सुंदर होण्यासाठी काही योजनांचा पाठपुरावा कराल. यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. प्रलंबित कामे पूर्ण झाल्यामुळे आज तुम्ही प्रसन्न असाल. कौटुंबिक स्तरावर सुखद अनुभव येईल. मुलांच्या नोकरीसंदर्भात चांगली बातमी कानावर येईल. सायंकाळी पाहुण्यांना भेटायला जाणार आहात.आज नशिब ७२ टक्के आपल्या सोबत आहे. शिवलिंगला दूध अर्पण करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *