तृतीया, चंद्राचे धनुराशीत संक्रमण आहे.असे म्हणतात की, भविष्यातील गोष्टींचा अंदाज आपल्याला लागला तर आपण सावध होतो आणि सांभाळून पुढे जातो. म्हणून तर राशीभविष्य तुम्हाला सजग बनवत असते. आजच्या दिवशी तुमच्या राशीत काय लिहीलं आहे. घर होणार का? नोकरी मिळणार का? व्यवसायात नफा होणार?नवीन प्रोजेक्ट येणार? गाडी घेवू का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असतील तर मग जाणून घेवूया, आजचे राशीभविष्य…

मेष राशीने घरगुती वादात शांत राहणे चांगले
आजच्या दिवशी तुमच्या कौटुंबिक जीवनात काही चढ-उतार येवू शकतात. घरात आज भावंडांसोबत मालमत्तेच्या संदर्भात काही वाद होवू शकतात, अशावेळी मौन बाळगणेच श्रेयस्कर ठरेल. नोकरदारांनी भविष्यासाठी काही गुंतवणूक केली असेल तर त्याचा तुम्हाला चांगलाच लाभ मिळू शकतो, ज्यामुळे तुम्ही आनंदी होणार आहात. संध्याकाळची वेळ कुटुंबातील सदस्यांसमवेत व्यतीत होणार असून एखाद्या शुभ समारंभात तुम्ही सगळे सहभागी होवू शकता. आज कुटुंबातील सदस्यांशी कोणत्याही वादात न पडणे हे तुमच्यासाठी चांगले आहे. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
आज नशीब ८८% तुमच्या बाजूने असेल. श्रीकृष्णाला लोणी-साखर अर्पण करा.

वृषभ राशीचे ऑफिसमध्ये कौतुक होणार
आजचा दिवस तुमच्यासाठी ठिक ठिक आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा मान-सन्मान वाढणार आहे. तसेच नोकरीच्या ठिकाणी तुमचे कौतुक होणार आहे.तुम्हाला कामात मदत मिळाल्यामुळे प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होणार आहे. वडिलांसोबत संबंध सुधारतील तसेच काही महत्त्वाचा सल्ला मिळू शकतो, ज्याचा तुम्हाला खूप उपयोग होईल. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांना नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
आज नशीब ८३ % तुमच्या बाजूने असेल. सूर्य नारायणाला सकाळी अर्घ्य द्यावे.

मिथुन राशीसाठी परोपकाराचा दिवस
आजचा दिवस इतरांना मदत करणे आणि परोपकार करणे यात जाणार आहे. दिवसातील काही वेळ धर्मदाय कार्यात व्यततीत करणार असून काही पैसा गरिबांच्या सेवेत जाणार आहे. आज विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल, ज्यामुळे ते आनंदात असतील. संध्याकाळी अचानक एखादी माहिती कानावर येईल आणि तुम्हाला परगावी जावे लागेल. लव्हलाईफमध्ये जोडीदाराची ओळख जर तुम्ही घरच्यांना करून दिली नसेल तर आजचा दिवस शुभ आहे एकदा भेट घडवून आणा. सासरच्या मंडळींकडून पैसे मिळणार आहेत. आज ७१ % नशीब तुमच्या बाजूने असेल. योग प्राणायाम करा.

कर्क राशीला व्यवसायात भरघोस नफा
कर्क राशीसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायात छोट्या छोट्या नफ्याच्या संधी ओळखून त्यांचे भांडवल करून भरघोस नफा कमवावा लागेल, तरच तुम्ही तुमची आर्थिक स्थिती तुम्ही मजबूत करु शकाल. आज व्यवसायात एक डिल होणार आहे त्याचा तुम्हाला भविष्यात भरघोस फायदा होणार आहे. मनातील काही गोष्टी पालकांसोबत शेअर कराल, ज्यामुळे मनावरील ओझे हलके होईल, परंतु संध्याकाळी तुम्हाला काही हवामान बदलामुळे होणाऱ्या आजारांचा सामना करावा लागेल. डोकेदुखी, ताप यामुळे त्रस्त व्हाला पण काळजी करु नका डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा.
आज नशीब ९५% तुमच्या बाजूने असेल. गणपतीला लाडू अर्पण करा.

सिंह राशीला प्रत्येक कामात भरघोस यश
आज तुम्ही जे काम कराल ते पूर्ण होईल तसेच तुम्हाला भरघोस यश मिळेल. तुमचा दिवस प्रगतीने आणि यशाने भरलेला आहे. तुमच्या मनात आले तर तुम्ही काही कामे पुढे ढकलू शकता, पण तुम्हाला त्यावर बारीक लक्ष द्यावं लागेल. त्यात जर सरकारी कामाचा समावेश असेल दुर्लक्ष करु नका, तातडीने ते काम करा अन्यथा भविष्यात अडचणीचा सामना करावा लागू शकतो. जीवनसाथीबरोबर छान वेळ व्यतीत करणार असून शॉपिंगला जाण्याचा बेत आखला जाणार आहे. फक्त खरेदी करताना पाकीटावर नीट लक्ष ठेवा, अन्यथा भविष्यात तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
आज नशीब ६५ % तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूचा १०८ वेळा जप करा.

कन्या राशीने शत्रूपासून सावध रहावे
आज तुमच्या भांडखोर शत्रूंपासून सावध राहावे लागेल, कारण तुमची प्रगती पाहून ते तुमचे काम बिघडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू शकतात. आज तर तुम्हाला तुमच्या काही मित्रांपासून देखील सावध राहावे लागेल जे तुमची स्तुती करतात पण त्यांच्या मनात तुमच्याबद्दल काही वेगळेच आहे. आज कुटुंबात प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत असेल तर संयम ठेवा, सगळं काही ठिक होणार आहे. मुलांना एखाद्या कोर्समध्ये प्रवेश देण्याचा विचार करत असाल तर आज तुम्ही त्यात यशस्वी व्हाल. आज संध्याकाळी एखाद्या सामाजिक कार्यक्रमाला उपस्थित राहाल.
आज ७२ % नशीब तुमच्या बाजूने असेल. भुकेल्या लोकांना जेवू घाला.

तुळ राशीसाठी सुखद परिणाम देणारा दिवस
आजचा दिवस तुमच्यासाठी सुखद परिणाम देणारा ठरणार आहे. विद्यार्थ्यांना आज शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या अडचणींपासून दिलासा मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. तुम्हाला मुलांच्या भविष्यासाठी काही गुंतवणूक करायची असेल तर जोडीदाराचा सल्ला नक्की घ्या, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. घरातील एखादा सदस्य लग्नासाठी योग्य असेल आणि तुम्ही स्थळ पाहत असाल तर आज चांगले प्रस्ताव येणार आहेत आणि कुटुंबातील सदस्य त्याला मान्यता देतील. तुमच्या कोणत्याही नातेवाईकाच्या आजारपणाबद्दल तुमची काळजी थोडी वाढणार आहे.
आज ७८ % नशीब तुमच्या बाजूने असेल. पांढरे रेशमी कपडे दान करा.

वृश्चिक राशीने पैशांचा व्यवहार करताना सावधान
आजचा दिवस तुमच्यासाठी ठिक ठिक असणार आहे. आई-वडिलांना एखाद्या धार्मिक स्थळी नेण्याचा बेत अचानक आखू शकता, ही चांगली गोष्ट आहे फक्त तुमची आवडती कोणतीही वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची भीती असते, त्यामुळे सावध राहा. आज पैशांचा कोणताही व्यवहार करण्यापूर्वी भावांचा सल्ला जरूर घ्यावा. आज तुमच्या मनात कोणतेही काम करण्याविषयी एक भीती किंवा चिंता निर्माण होईल पण काळजी करु नका फायदा तुमचाच होणार आहे.
आज नशीब ८२ % तुमच्या बाजूने असेल. दररोज संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करावे.

धनु राशीने भावनिकतेमध्ये निर्णय घेवू नये
घर किंवा व्यवसायात भावनांमध्ये वाहून जाऊन कोणताही निर्णय घेणे टाळावे लागेल. आज तुम्ही कौटुंबिक किंवा व्यवसायातील भावनांमध्ये वाहून जावू नका, अन्यथा भविष्यात ती मोठी चूक ठरू शकते. वैयक्तिक जीवनात आज चांगला वेळ व्यतीत होईल. आज भावंडांशी काही वाद असतील तर तो संपेल. नोकरी करणाऱ्या लोकांना संध्याकाळी एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना आज काही तोटा सहन करावा लागू शकतो.
आज नशीब ६४ % तुमच्या बाजूने असेल. गायींना गूळ खायला द्यावा.

मकर राशीने नात्यामधील कटूता संपवावी
आज प्रॉपर्टी मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल, आज तुमचा कोणाशी वाद असेल तर कटुतेचे गोडव्यात रुपांतर करुन त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा अन्यथा हे असचं चालू राहणार आहे. त्यामुळे नात्यात अधिक दुरावा वाढेल. मुलांकडून काही निराशाजनक बातमी ऐकल्यामुळे तुम्ही थोडे चिंताग्रस्त असाल, परंतु आज तुमची संपत्ती मिळविण्याची इच्छा पूर्ण होईल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. आज पालकांच्या आरोग्याची ही काळजी घ्यावी लागेल. त्यांच्या आरोग्याच्या काही तक्रारी असतील तर वैद्यकीय सल्ला घ्यावा.
आज नशीब ७६ % तुमच्या बाजूने असेल. बजरंग बाणाचे पठण करा.

कुंभ राशीवर मानसिक ताण वाढणार
आज तुम्हाला थोडा मानसिक ताण येऊ शकतो, जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये काही दुरावा निर्माण झाला असेल, तर तो आज जास्त वाढेल, कुटुंबातील या ताणतणावाचा सामना करताना तुम्ही शांत राहणे योग्य आहे. तुम्ही आज दैनंदिन गरजा भागविण्यासाठी काही पैसे खर्च कराल. संध्याकाळची वेळ कुटुंबासोबत मस्त मजेत जाणार आहे. नोकरी करणाऱ्यांना चांगली ऑफर मिळू शकते परंतु तूर्तास त्याच नोकरीवर राहणे तुमच्यासाठी उत्तम आहे.
आज नशीब ८९ % तुमच्या बाजूने असेल. मुंग्यांना पीठाचे गोळे खायला द्या.

मीन राशीचे छुपे शत्रू वाढणार सावध राहा
परदेशातून व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल, कारण आज तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार आहेत. ज्यामुळे तुमचे उत्पन्न दुप्पट होईल, तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे पण यामुळे काही नवे शत्रूही उभे राहणार आहेत. त्यामुळे तुम्हाला त्यांच्यापासून सावध राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा लागेल, मुलांच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा भविष्यात ते तुम्हाला काही अडचणीत आणू शकतात.
आज नशीब ८३ % तुमच्या बाजूने असेल. भगवान सूर्य नारायणाला सकाळी अर्घ्य द्या.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *