नमस्कार मित्रांनो..Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक अंतराने राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो. जेव्हा ग्रहाच्या गोचर कक्षेत एखादा अन्य ग्रह येतो तेव्हा त्यांच्या एकत्रित प्रभावाने काही राजयोग तयार होत असतात.

साधारणतः ३० दिवस म्हणजेच एका महिन्याचा कालावधीत ग्रहांच्या हालचाली होत असतात, काही ग्रह गोचर करत नसले तरी त्यांच्या भ्रमण कक्षेत मार्गी होण्याने, उदय व अस्त होण्याने सुद्धा राजयोग तयार होऊ शकतात. डिसेंबर महिन्यात सुद्धा अशाच ग्रह गोचरांनी तीन अत्यंत शुभ राजयोग तयार होणार आहेत. मालव्य, शष, महाधन या तीन राजयोगांनी डिसेंबर महिन्यात काही राशींच्या कुंडलीत सकारात्मक बदल होणार आहेत. या राशींच्या व्यक्तींना प्रचंड धनलाभ होऊ शकतो पण त्याचे नेमके माध्यम काय असू शकते याविषयी ज्योतिषीय अंदाज जाणून घेऊया..

डिसेंबर महिन्यात ३०० वर्षांनी जुळून येणार तीन महा राजयोग
मेष रास (Aries Rashi Bhavishya)
मेष राशीसाठी शनीचा शष राजयोग, बुध ग्रहाचा मालव्य राजयोग अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. तुमच्या भाग्यात परदेश प्रवासाचे योग आहेत. विवाहइच्छुक मंडळींच्या बाबतीत लग्न जुळण्याचे योग आहेत. वाणीच्या बळावर मोठी पदोन्नती करू शकणार आहात. तुम्ही आजवर शांततेने केलेल्या कामाचा डंका सर्वत्र वाजणार आहे. तुमच्या यशामुळे काही हितशत्रू तयार होऊ शकतात पण तुम्ही या साऱ्या अडथळ्यांवर मात करू शकणार आहात. गर्व करणे टाळावे. तुम्हाला वैवाहिक आयुष्यात सुख समाधान लाभू शकते ज्यामुळे इतर कामांमधील तुमची ऊर्जा वाढण्याची शक्यता आहे.

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)
मिथुन राशीसाठी महाधन राजयोग हा सर्वाधिक सक्रिय व प्रभावी योग असणार आहे. डिसेंबर महिन्यात तुमच्या राशीला वाडवडिलांच्या संपत्तीचा मोठा वाटा मिळू शकतो. तुमची नाती सुधारतील ज्यामुळे तुमचा एकटेपणा दूर होण्यास मदत होईल. मित्र- मैत्रिणीच्या रूपात धनलाभाचे योग आहेत. भागीदारीत केलेल्या कामाचा मोठा लाभ होऊ शकतो. अडकून पडलेल्या कामांना गती मिळेल. पोटाची काळजी घेणे आवश्यक आहे.

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)
मकर राशीला तिन्ही राजयोगांसह रुचक राजयोग सुद्धा लाभदायक सिद्ध होणार आहे. तुम्हाला गुरुकृपा अनुभवता येऊ शकते. काही वेळा मानसिक ताण- तणावात तुम्ही स्वतःच्या ज्या चांगल्या बाजूंकडे दुर्लक्ष केले होते त्याच कलागुणांमधून तुम्हाला या काळात काम, पैसे, प्रसिद्धी प्राप्त होऊ शकते. डिसेंबर महिना तुमच्यासाठी इतके फायदे घेऊन येत असल्याने जानेवारीच्या सुरुवातीला सुद्धा तुम्ही आनंदी व समाधानी आयुष्यात जगू शकता. मकर राशीला शनीच्या साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात शनीच्या तीव्र हालचालींमुळे आयुष्यात वेग अनुभवता येऊ शकतो.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *