बुध आणि शुक्र ग्रहांची स्थिती 15 ऑगस्टपर्यंत या राशींसाठी त्रासदायक काळ.. कोणत्या राशी ते जाणून घ्या..

नमस्कार मित्रांनो.. या आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचं मनापासून स्वागत आहे.. बुध आणि शुक्राच्या स्थितीमुळे मोठी उलथापालथ झाली आहे. त्यामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येणार आहे. चला जाणून घेऊयात याबाबत..

ग्रहांच्या स्थितीचा परिणाम त्या त्या राशीच्या जातकांवर होत असतो. त्यात पापग्रह आणि शुभग्रह अशी वर्गवारी असल्याने त्याचे तसे परिणाम दिसून येतात. काही ग्रहांचं एकमेकांसोबत पटत नाही त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम दिसतो. सिंह राशीत अशीच ग्रहांची उलथापालथ झाली आहे. 26 जुलैला सिंह राशीत बुध आणि शुक्राची युती झाली आहे.

या ग्रहांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण योग तयार झाला आहे. त्यामुळे काही राशीच्या जातकांना लाभ होणार आहे. तर काही राशीच्या जातकांना सांभाळून राहावं लागेल. शुक्र आणि बुधाच्या युतीमुळे भौतिक सुख, मान सन्मान आणि स्थितीवर परिणाम दिसून येईल. त्यामुळे 15 ऑगस्टपर्यंतचा काळ काही राशींना अडचणीचा जाणार आहे. चला जाणून घेऊयात या राशींबाबत..

या राशींना बसणार मोठा फटका..

कन्या रास – बुध आणि शुक्राच्या युतीचा फटका या राशीच्या जातकांना बसेल.नवीन काम हाती घेतलं असेल तर त्याची प्रचिती दिसून येईल. काम नीट होणार नाही, उलट आर्थिक फटका बसेल. ठरवलेल्या योजनेनुसार काहीच घडताना दिसणार नाही.

त्यामुळे कामं करताना काळजी घ्या. आर्थिक स्थिती पाहूनच गुंतवणूक करा. कारण नुकसान झाल्यास परत रुळावर येण्यास वेळ लागेल. खासगी कंपनीत काम करणाऱ्या जातकांनी विचार करून निर्णय घ्यावा.

धनु रास – नुकतीच साडेसातीच्या फेऱ्यातून सुटका झाली असून बुध आणि शुक्राची युती त्रासदायक ठरू शकते. नशिब किती दगा देऊ शकतं याची अनुभूती येईल. एखादं काम होता होता राहून जाईल. जवळची व्यक्ती तुमची संपूर्ण योजना निष्फळ करू शकते.

त्यामुळे विश्वास ठेवतान काळजी घ्या. वैवाहिक जीवनातही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शत्रूपक्षाकडून विनाकारण त्रास दिला जाईल. कदाचित न्यायालयाची पायरीही चढावी लागू शकते.

मकर रास – बुध आणि शुक्राच्या युतीमुळे आर्थिक, मानसिक समस्येचा सामना करावा लागू शकतो. कामं तर होतील पण हवं तसा मोबदला मिळणार नाही. त्यामुळे भ्रमनिरास होईल. तसेच केलेल्या कामाचं कौतुक तर सोडा उलट दोन शब्द ऐकावे लागतील.

हे सुद्धा पहा :वर्षानंतर 3 राशींच्या गोचर कुंडलीत चार महा राजयोग, ग्रहांच्या साथीने होणार मालामाल..

त्यामुळे आत्मविश्वास ढासळून जाईल. जुनं ते सोनं याची प्रचिती येईल. तुम्हाला वाटणार आधी करत असलेला जॉबच बरा होता असं वाटेल.पण आता आलेल्या प्रत्येक समस्येचा सामना करणं भाग आहे हे लक्षात ठेवा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *