देवी माता लक्ष्मी ही धनाची देवता मानली जाते. ज्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा असते तिथे पैशाची कमी नसते. देवी माता तिथे नेहमी वास करते. आपल्या सर्वांनाच वाटते की आपलं आयुष्य छान असावं,सुखी असावं, घरात सोयी सुविधा, समाजात मान प्रतिष्ठा, तसेच आपल्या प्रयत्नांना भरपूर यश मिळावं यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत असते, तसेच एखाद्या सभेत गेल्यानंतर उठून दिसण्यासाठी हा उपाय आपण करू शकता.सनातन धर्मात लवंग अत्यंत पवित्र मानली जाते.

पूजेत इत्यादी गोष्टींमध्ये लवंगीचे विशेष महत्त्व आहे. लवंग आरोग्यासाठी आणि चवीसाठी फायदेशीर असण्यासोबतच ज्योतिषीय उपायांमध्येही लवंगाचा वापर प्रभावी मानला जातो. पूजेव्यतिरिक्त, लवंगाचा उपयोग तंत्र मंत्रामध्ये देखील केला जातो कारण ती ऊर्जा वाहक मानली जाते.

तुमचे नशीब बदलण्यासाठी आणि तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्ही लवंगाच्या लोकप्रिय युक्त्या आणि उपाय देखील वापरून पाहू शकता. हा उपाय इतका प्रभावशाली आहे की तुम्ही जिथे कुठे असाल लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, तुमचे व्यक्तिमत्व एक अनन्यसाधारण बनेल.

यासाठी फक्त 2 लवंगांचा वापर करणार आहोत, लवंग हा एक मसाल्याचा पदार्थ आहे, प्रत्येक किचनमध्ये स्वयंपाक घरात तुम्हाला तो दिसून येईल. घर नेहमी स्वच्छ ठेवणे, घरातील नको असणाऱ्या तुटक्या, फुटक्या वस्तू बाहेर काढणे यामुळे घरात माता लक्ष्मीचा वास कायम राहतो. तसेच घरातील अशा काही वस्तू आहेत जय नेहमी घरात ठेवल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील.

आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक ठिकाणी अनेक उपाय सांगण्यात येतात, घरी पैशाची चणचण असते, आर्थिक ओढाताण असते, अशा वेळी सुचत नाही काय करायचं. तुमच्या डोक्यावर जर कर्जाचा डोंगर असेल आणि ते फेडण्यासाठी तुम्हाला अडचणी येत असतील तर तुम्ही भगवान विष्णूंच्या नरसिंह अवताराची पूजा करायची आहे.

विष्णूच्या स्तोत्राचा जप करा त्यामुळे तुम्हाला लवकर मार्ग सापडतील. त्यामुळे तुम्ही आर्थिक अडचणीतून बाहेर पडाल. नोकरीमध्ये समस्या येत असतील, नोकरीत अडचणी येत असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करा. काही कामे पूर्णत्वास येता येता थांबतात. खूप साऱ्या अडचणी उभ्या राहतात, त्यासाठी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी हा उपाय अगदी सहज व सोपा आहे.

हा उपाय करण्यासाठी रोज सकाळी पूजा करताना हा उपाय तुम्हाला करायचा आहे, तसेच घरातील या अडचणी दूर करण्यासाठी रोज श्रीसुक्त, महालक्ष्मी स्तोत्र जप करावा. तसेच तुम्ही ही 1 वस्तू माता लक्ष्मी च्या चरणी वाहून प्रार्थना करा. रोज सकाळी एक साबूत लवंग म्हणजे न फुटलेली, न तुटलेली लवंग घ्या व ती देवपूजा झाल्यावर माता लक्ष्मीची प्रतिमा , फोटो असेल तिथे अर्पण करा तुमच्या प्रगतीसाठी प्रार्थना करा.

तसेच मग दुसऱ्या दिवशी सकाळी निर्माल्य काढताना ही लवंग त्यात न मिसळता एका डबीत ठेवा. असे सलग 21 दिवस करावे व या लवंगा साठवा. जेव्हा 21 दिवस होतील त्यानंतर कधीही आपल्या परिवारासोबत आपण कोल्हापूर च्या महालक्ष्मी ला दर्शनासाठी जा, व तिथे या लवंगा अर्पण करा, असे केल्यास माता भरपूर आशीर्वाद देईल व तुमच्या घरी अमाप पैसा येईल.

ज्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील. असे म्हणतात की, लक्ष्मीची पावले घरात आणल्याने साक्षात लक्ष्मी घरात वास करते. चांदीची पावले असलेली प्रतिमा घरी असावी तसे शक्य नसल्यास बाजारात इतर धातूची पावले सुद्धा मिळतात, ही पावले शुभ चिन्हासोबतही असतात, जसे की मंगल कलश, स्वस्तिक, ओम चिन्ह व काही ठिकाणी लक्ष्मी यंत्र देखील असते.

आवळ्याचे झाड शक्य असल्यास आपल्या अंगणात, कुंडीत लावा कारण आवळ्याच्या झाडावर भगवान विष्णूचा वास असतो, जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी असते. त्यामुळे या झाडाचे पूजन रोज करावे. तसेच चांदीत माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे घरी एखादे तर लक्ष्मीचे चांदीचे नाणे असावे. तसेच घरात लक्ष्मी कुबेर यंत्र किंवा लक्ष्मी यंत्र स्थापन करून त्याची पूजा केल्यास माता लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *