नमस्कार मित्रांनो.. “Marathi Duniya” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो.. स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नाचे महत्व सांगितले आहे, त्यामधील काही स्वप्न शुभ तर काही अशुभ मानली जातात म्हणजेच त्या त्या घटना घडण्याचा संकेत मानला जातो. आपण श्रीमंत बनण्यापूर्वी किंवा धनवान बनण्यापूर्वी आपल्याला ही स्वप्न नक्की पडतात मात्र हे स्वप्न बघितल्यानंतर आपण पुन्हा झोपी जाऊ नका किंवा स्वप्नांबद्दल इतर कुणाजवळही बोलू नका.

आपल्याला स्वप्न पडतात कारण जेव्हा आपण झोपतो, आपले ऐच्छिक स्नायू काम करणे बंद करतात, जे अनेक इंद्रिये असतात हृदय मज्जासंस्था यांचे कार्य मात्र चालूच असतात. आपलं मन जागृतावस्थापेक्षा झोपलेले अवस्थेमध्ये जलद गतीने फिरत असतं. आपलं विचार चक्र जोरात चालू असतं आणि मग आपण आत्तापर्यंत जे काही वाचलं आहे, ऐकत होतो,अनुभवलेल आहे, मान राग लोभ जो आपल्या वाट्याला आलेला आहे.

याबद्दल आपलं मन विचार करत आणि जे दिवसात निद्रिस्त असतात आणि मग त्यांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतं, हे सर्व उफाळून येतात झोपल्यानंतर आणि मग या संस्कारांची मोडतोड करून त्याचं रूप बदलून त्याचा एक चित्रपट मन तयार करतं यालाच आपण म्हणतो स्वप्न. या स्वप्नांचा विचार शास्त्रांमध्ये केलेला आहे, तुम्हाला स्वप्न नक्की कधी पडल आहे, केव्हा पडल आहे यावर सुद्धा त्या स्वप्नाच फळ अवलंबून असतं.

रात्रीच्या पहिल्या प्रहरात पडलेले स्वप्न एक महिन्यात फळ देते, तर दुसऱ्या प्रकारातील स्वप्नाच फळ तीन महिन्यात, चौथ्या प्रहरातील स्वप्नाच फळ एका महिन्यात आणि सकाळी पडलेल्या स्वप्नांचा फळ देतात असा आत्तापर्यंतचा या शास्त्राचा अभ्यास आहे. श्रीमंत बनण्यापूर्वी आपल्याला नक्की कोण कोणती स्वप्न पडतात ते नक्की जाणून घ्या. पहिलं स्वप्न, स्वप्नामध्ये अशोकाचं, चंदनाचं, गुलबक्षीच, सुपारी, नारळ किंवा अक्रोडाचे झाड दिसल्यास तुम्ही लवकरच धनवान बनणार.

हे स्वप्न पाहिल्यास झोपी जाऊ नका आणि या स्वप्नाबद्दल कोणालाही सांगू नका. तुमची चांगली वेळ योग्य वेळ अगदी जवळ आलेली आहे. त्याचा फायदा मात्र घ्यायला विसरू नका. कष्ट आणि परिश्रम मध्ये मागे पडू नका. दुसरा स्वप्न आपण स्वप्नात लवंग विलायची म्हणजेच वेलची कापूर हे पदार्थ पाहत आहोत किंवा खात आहोत असं स्वप्न. हे स्वप्न सुद्धा धनलाभ सूचक आहे. गुलाब बकुळ केवढा जुई बेला यांचे फुल स्वप्नात पाहणं हे सुद्धा श्रीमंत होण्याच आहे.

स्वच्छता, आपले केस गळत आहेत आणि डोके टक्कल पडत आहे असं जर पाहिलं तर शंभर टक्के धनप्राप्तीचे योग निर्माण होतातच. याबद्दल कुठेही वाच्यता करु नका. आपण पानाचा विडा जो नागवेलीची नागिनीचे पान म्हणतात अशी विड्याची पाने किंवा उस खाताना पाहिलं तर श्रीमंत व्हायला जास्त वेळ लागत नाही.

हत्ती पाहिलं आणि तुम्हाला जर त्याची भीती वाटली नाही आणि लगोलग जर तुम्हाला जाग आली तर लक्षात घ्या माता प्रत्यक्ष लक्ष्मीचे आगमन हे तुमच्या घरात होणार आहे. सात पिढ्यांना पुरेल इतका पैसा तुमच्या जीवनात नक्की येणार आहे. स्वप्नात नदीमध्ये स्नान करताना पाहणं हे सुद्धा अत्यंत चांगले स्वप्न आहे.

तुम्ही तर स्वतः स्वप्नामध्ये फुले किंवा फळे खात आहात हे जर तुम्ही पाहिलं तर हे सुद्धा लक्ष्मी प्राप्तीचे एक खूप मोठ लक्षण आहे. जर तुम्ही स्वतः दुसऱ्याची निंदा करत आहात किंवा एखाद्याची हत्या करत आहात किंवा साखळीने बांधत असल्याचे जर तुम्ही पाहिलं तर यांनी सुद्धा लवकरच धन प्राप्त होणार आहे. या स्वप्नाबद्दल वाच्यता कृपया करू नका. स्वप्नामध्ये तलाव दिसणे म्हणजे पुष्कळ धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे.

तसेच स्वप्नामध्ये ध्वज पताका म्हणजे एखादा झेंडा फडकला पाहणे हे गोष्ट धनलाभ होऊ शकतो किंवा संतती प्राप्ती होऊ शकते मूलबाळ होऊ शकतात. स्वतःवरती जलाभिषेक होताना पाहणे म्हणजेच स्वतःच्या डोक्यावरती जल पडताना पाहणे याचा अर्थ भूमीगत धनाची प्राप्ती होणार आहे. स्वतःला पूर्व दिशेला चालताना पाहणे लाभाचा संकेत आहे. स्वप्नामध्ये स्वतःला तलवारीने युद्ध करताना लढाई करताना पाहणे धनलाभ. पर्वत किंवा मंदिरावर किंवा एखाद्या मोठ्या महालावर चढत असल्याचे स्‍वप्‍नात पाहिल्‍यास कोणत्या ना कोणत्या मार्गाने अचानक मोठा पैसा तुम्हाला प्राप्त होणार आहे.

आकाशात पक्षी उडत आहेत हे स्वप्नसुद्धा धनलाभाच्या सूचक आहे. पांढ-या रंगाचा बैल पाहणे अत्यंत शुभ आहे आणि लक्षा बैलाची पूजा करा जर तुम्हाला स्वप्न पडलं तर गुप्तधन हाती लागतं. बैलाबरोबर तुम्ही खेळत आहात असं जर स्वप्न पडलं पडलं तर त्याचा लाभ हा खूप कमी दिवस आधी धनलाभ होतो. स्वप्नामध्ये मासे पाहिल्यास अत्यंत शुभ असते.

मासे विकणारा जो कोणी या कोळ्या जवळील मासळी पाहिल्यास धनलाभ होतो आणि मासळी घेऊन जाणारा माणूस पाहिल्यास कोणत्याही कार्यात तुम्ही कार्य हाती घेतले आहे त्यामध्ये यशस्वी होणार. स्वतःच्या शरीरातून रक्त स्त्राव होत आहे असे स्‍वप्‍न पाहिल्‍यास धनधान्य यामध्ये वाढ होते. परंतु दुसर्‍या कुणाच्या शरीरातून रक्त स्त्राव होताना स्‍वप्‍न पाहिल्‍यास कार्य सिद्धीस जातं कार्य पूर्ण होतं. स्वप्नामध्ये धुवाधार अगदी मुसळधार पाऊस पण त्याचं जर तुम्हाला चित्र दिसलं तर तुमच्या घरात प्रचंड भांडणे निर्माण होऊ शकतात.

मित्र दूर राहू शकतात. यासोबतच घरात भांडण होतील. मित्र दुरावतील. मात्र व्यापारामध्ये उद्योगधंद्यांमध्ये मोठं यश मिळू शकतो .मोठा पैसा धन प्राप्ती होऊ शकते. स्वप्नामध्ये समुद्र दिसला किंवा समुद्राच्या लाटा पाहिल्या तर हा लक्ष्मी प्राप्तिचा मोठा योग आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *